आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीने पुण्यात केले \'एक लीला पहेली\'चे प्रमोशन, माध्यमांशी साधला संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राजस्थान मध्ये साकारलेली 'लीला' भूमिकेतून बाहेर येवू देत नव्हती. रोल संपल्यावरही अंगात संचारलेल्या 'लीला ' मधून बाहेर येण्यास वेळ लागत होता. मराठी आणि अन्यभाषिक चित्रपटांसाठी ऑफर येतात पण चांगला चित्रपट असेल तर मी मेहनत घेऊन मराठीत काम करेल असे प्रख्यात अभिनेत्री सनी लियोनने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
१० एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या 'एक पहेली लीला' या चित्रपटाच्या अनुषंगाने सनी आपला पती डँनियल वेबर आणि सिनेमाचे दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासमवेत पुण्यात आली होती . यावेळी स्वतंत्ररित्या आणि सामुहिकरित्या आलेल्या अशा सर्व माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला
ती म्हणाली , मला बिग बॉस मुळे भारतात येण्याची संधी मिळाली, बिग बॉसचा फोन आला आणि पतीनेदेखील तत्काळ भारतात येण्याची परवानगी दिली. त्यानंतर मागे-पुढे पहिले नाही, जे मला येत नाही त्यावर ही कष्ट घेत ते ते करीत राहिले आणि बॉलीवूडची वाट ही कधी धरली समजले नाही . भारतात खूप प्रेम मिळाले आणि मग माघारी जाण्याची इच्छा होईना. आता तर माझा पती ही बरोबरच इथे आहे जीवनात त्याची साथ खूपच महत्वपूर्ण ठरली. शूट आऊट वडाळा च्या सेटवर 'लैला' या गाण्याच्या चित्रीकरणाच्या समयीच बॉबी खानने लीला तूच कर असे सांगितले . लीला मध्ये प्रमुख पाहुण्याची भूमिका ही माझा पती डेनियलने केली. आता तो ही बॉलीवूड मध्ये काम करू लागला आहे.
लीला या चित्रपटासाठी हिंदी भाषा येणे आवश्यकच होते यासाठी स्पेशल हिंदी क्लास च सुरु केला आणि हिंदी बोलण्यास प्रारंभ केला मराठी चित्रपट चांगला मिळाला तर मराठी हि शिकेल. 'एक पहेली लीला' या चित्रपटात माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. रहस्य आहे यात. एक राजस्थानची लीला आणि एक लंडनची लीला मी साकारली आहे राजस्थान मध्ये भयानक उष्मा होता आणि तिथे मेकअप करून कामाला सुरुवात केली कि १५ मिनिटात मेकअप खराब होत आणि पुन्हा पुन्हा मेकअप करावा लागे या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आणि भारतात मेहनतीचे फळ मिळतेच मिळते असा माझा अनुभव आहे आणि विश्वास ही आहे असे ती म्हणाली.
बॉबी खान म्हणाले. माझे शिक्षण पुण्यात झाले आहे . चित्रपटाची कथा पुनर्जन्मावर आधारित असली तरी रहस्य शेवटी उघड होते या चित्रपटासाठी जोधपुरच्या अलीकडे खिम्सार येथे लीला चे गावच आम्ही वसवले होते भूषणकुमार , किशनकुमार ,अहमदखान आणि सायरा खान असे ४ निर्माते या चित्रपटाला लाभले आहेत जय भानुशाली हा चित्रपटाचा नायक आहे तर जस अरोरा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. असे बॉबी खान यांनी सांगितले.
लीला ला १०० लिटर दुधाने घातलेली अंघोळ-
या चित्रपटाला '' सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाच्या पुढची कॉपी म्हणणे , खास लंडन हून लीला साठी तयार करवून घेतलेला ड्रेस अशी या चित्रपटाची वैशिष्टे प्रदाशित होण्यापूर्वीच गाजत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचे पुण्याच्या प्रमोशनवेळची छायाचित्रे...