आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Said She Will Not Get Any Award In Future

सनी म्हणाली, 'भूतकाळामुळे मिळणार नाही मला कुठलाही अवॉर्ड'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री सनी लिओन)
मुंबईः अलीकडेच रिलीज झालेला सनी लिओन स्टारर 'एक पहेली लीला' हा सिनेमा तिकिटबारीवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 18.03 कोटींचा व्यवसाय केला आहे. सिनेमाचा निर्मिती खर्च 17 कोटी एवढा आहे. एकीकडे सिनेमा प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय, तर दुसरीकडे बॉलिवूडची बेबी डॉल सनीला वाटतंय, की तिच्या भूतकाळामुळे तिला भविष्यात कोणताही अवॉर्ड मिळणार नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना वाटतं की मी कोणत्याही मोठ्या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे सनी लिओनने अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे.
माझी अशी अपेक्षाही नाही की मला कोणता पुरस्कार दिला जावा. किंबहुना माझा भूतकाळ पाहता, मला पुरस्कार दिला जाईल अशी शक्यताही नाही, अशी खंत सनीने व्यक्त केली.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनीने कबूल केले, की तिला पुरस्कार सोहळ्यात जाण्याची इच्छा आहे. कारण अनेक सिनेकलाकारांना भेटता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल. शिवाय कुणाला पुरस्कार मिळाल्यास आनंद होत असल्याचे ती म्हणते.

अभिनेत्री कंगना रणावतला 'क्वीन' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद झाल्याचेही तिने नमूद केले.