आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनीच्या शरीरात वाढली Heat, डॉक्टरांनी दिला हा खास सल्ला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री झालेल्या सनी लिओनला तिच्या फॅमिली डॉक्टरांनी एक खास सल्ला दिला आहे. तिच्या डॉक्टरांनी तिला चक्क नॉनव्हेज बंद करायला सांगितले आहे. तिला शाकाहारी जेवण म्हणजेच वेगन डायटचा सल्ला दिला आहे. तसेच तिला अल्कोहल, दुग्धजन्य पदार्थ आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. मी अनहेल्दी आहे आणि माझं रक्त शुद्ध होण्याची गरज आहे. माझ्या शरीरात प्रचंड हिट आहे. यासाठी मी आता खास चहा पिते आहे. जो फारच बेचव आहे, असे सनीने ट्विट करुन सांगितले आहे.

ट्विट करुन सनीने चाहत्यांना दिली माहिती...
सनीने ट्विट केले आहे, 'सॅड मॉर्निंग. माझ्या चायनीज डॉक्टरांनी मला डेली रुटीन बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी मला कॅफीन, अल्कोहोल, डेअरी प्रॉडक्ट्स, मीट आणि मसालेदार जेवणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. माझा ट्रेडिशनल चायनीज ट्रिटमेंटवर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांचा सल्ला अंमलात आणतेय. आता मी अल्कोहोल, कॅफीन आणि टॉक्सिन्स घेणार नाही."

सनी लिओनचा बेईमान लव हा सिनेमा अलीकडच्या काळात रिलीज झाला आहे. रजनीश दुग्गलसोबत सनी स्क्रिने शेअर करणारेय. राजीव चौधरी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र अपयशी ठरला आहे. फेसबुकवर सनी लिओनीचे 20 मिलियन (2 कोटी) हून फॉलोअर्स झाले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सनी लिओनीचे ट्विट्स आणि काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...