आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Will Not Take Onscreen Kiss Of Actor

आता किस-बिस नाही गं बाई -म्हणाल्या सनी लिओन ताई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चित्रपटात सनी लिओन असेल तर किसिंग सिन्स निश्चितच असतात. किस आणि सनी लिओनचे अगदी घट्ट नाते आहे. पण बेबीडॉलने आता अगदी विपरित भूमिका घेतली आहे. तिचे चाहते याने नाराज तर होणारच आहेत. शिवाय चित्रपटांमध्ये भडक स्वरुपाचे रोल मिळणेही अवघड होऊन बसणार आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना सनी लिओनने आता ऑनस्क्रीन किसिंग सिन करणार नसल्याचे म्हटले आहे.
भारतीय सिनेमांमध्ये किसिंग सिन योग्य वाटत नाही, असे सनी लिओनने म्हटले आहे. विशेष म्हणजे किस घेण्याचा अधिकार केवळ माझा नवरा डॅनियल यालाच असल्याचेही तिचे म्हणणे आहे. दुसऱ्या कुणासोबत किस करण्याचा विचारही करावासा वाटत नाही, असेही तिने सांगितले आहे.
‘मस्तीजादे’ या सेक्स कॉमेडी सिनेमाला सेन्सॉर बोर्डने हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळे सनी लिओन आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. यासाठी ती कोणताही सिनेमा स्वीकारण्यापूर्वी निर्मात्यासोबत एक करार करणार आहे. अभिनेत्यासोबत ऑनस्क्रिन किसिंग करणार नसल्याची अट त्यात राहणार आहे.