आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनच्या भावाने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे तिची होणारी वहिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन आणि तिचा भाऊ संदीप वोहरासोबत करिश्मा नायडू - Divya Marathi
सनी लिओन आणि तिचा भाऊ संदीप वोहरासोबत करिश्मा नायडू
मुंबई: सनी लिओनचा भाऊ संदीप वोहरा बोहल्यावर चढणार आहे. त्याच्या आणि फॅशन स्टायलिस्ट-वॉर्डरोब कंसल्टेंट करिश्मा नायडूच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. करिश्माने हा फोटो शेअर करून लिहिले, 'मला तुझ्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे. याचा विचार करूनच माझे मन आनंदाने नाचत आहे. तू नेहमी माझा सनशाइन आहे. मी आज, उद्या आणि नेहमी तुझ्या प्रेम करेल. हे सांगताना स्वत:ला नशीबवान आणि आनंदी वाटतेय, की माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करत आहे.'
प्रोफेशनल शेफ आहे सनीचा भाऊ...
संदीप कॅलिफोर्नियातील किंग्स रो गेस्ट्रो या प्रसिद्ध पबमध्ये एग्झिक्युटीव्ह शेफ म्हणून काम करतो. त्याने तयार केलेल्या डिशेज खूप प्रसिद्ध आहेत. सनी लिओनचा भाऊदेखील तिच्यासारखाच स्मार्ट आहे. बोलवर्ड मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संदीप वोहराने फार कमी वयापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. इतकेच नाही तर संदीपच्या उत्कृष्ट कुकींगमुळे हा पब काही वर्षांतच कॅलिफोर्नियातील लोकप्रिय पब ठरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीच्या होणा-या वहिणीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...