आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sureshmal Mathur Statement On Akshay Kumar Film Airlift

‘एअरलिफ्ट’मधील रणजित ही व्यक्तिरेखा काल्पनिकच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंजीत कात्यालच्या पात्रात अक्षय. कुवेतमधील एअरलिफ्ट मिशनचे इंचार्ज राहिलेले सुरेशमल माथुर - Divya Marathi
रंजीत कात्यालच्या पात्रात अक्षय. कुवेतमधील एअरलिफ्ट मिशनचे इंचार्ज राहिलेले सुरेशमल माथुर
देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये रणजित कात्यालच्या व्यक्तिरेखेवरून रकानेच्या रकाने छापून आले आहेत. अखेर रणजित कात्याल कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. या वादग्रस्त व्यक्तिरेखेचे वास्तव जाणण्यासाठी "भास्कर'चे प्रमोद दवे यांनी एअरलिफ्ट मोहिमेचे इंचार्ज राहिलेले सुरेशमल माथूर यांच्याशी केलेल्या चर्चेत १९९० मध्ये १ लाख ७० हजार भारतीयांना वाचवण्यात रणजित यांनी कोणती भूमिका बजावली ते जाणून घेतले.

१९९० मध्ये कुवेतमध्ये भारतीय वकिलातीत दुय्यम सचिव होतो. त्या वेळी इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तिथे अडकलेल्या १ लाख ७० हजार भारतीयांना मायदेशात सुखरूप आणणे ही आमची पहिली प्राथमिकता होती. मात्र, वास्तवात हल्ल्यानंतर भारतीयांना परत आणण्यात मदत करणारा रणजित कात्यालसारखा कोणताही अनिवासी भारतीय नव्हता. भारतीयांना आणण्याचा संपूर्ण खर्च भारत सरकारने केला होता. एअर इंडियाची विमाने दररोज ६ ते ८ फेऱ्या मारून जॉर्डनस्थित बेस कॅम्पमधून भारतीयांना दुबईपर्यंत पोहोचवत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अभियानात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल एअर इंडियाचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले. हल्ल्याच्या दिवसापासून संपूर्ण भारतीयांना बाहेर काढण्यापर्यंत मी तिथेच होतो. त्यामुळे मी तिथून परतल्यानंतर एखादा अशी व्यक्ती असण्याची कोणत्याही शक्यता नाही. मी कुवेतमधूनच नव्हे, तर बसरा आणि जॉर्डनमधूनही भारतीयांना काढले. काही लोकांनी मदतीसाठी पुढे आले खरे, परंतु त्याचे स्वरूप भारतीयांना बसमध्ये पाठवण्यासाठीची माहिती देण्यापुरती मर्यादित होती. एका एनआरआयने कार्यालयासाठी आपले घर मात्र दिले होते. त्या ठिकाणी चर्चा करत असू. मात्र, रणजित कात्यालसारखी मदत करणारा एनआरआय नव्हता. कुवेतवर २ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता हल्ला झाला तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली. भारतीयांनाही मायदेशी कधी जाऊ, असे झाले होते. कसेही करून आम्हाला भारतात पाठवा म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीयांना दूतावासासमोर रांगा लावल्या होत्या. हल्ल्यानंतर कुवेतच्या दूरध्वनी जोडण्या तोडण्यात आल्या होत्या. केवळ लोकल कॉल करता येऊ शकत होता. कुवेतवरील हल्ल्याच्या १५-२० दिवसांनंतर तत्कालीन भारतीय परराष्ट्र व्यवहारमंत्री इंद्रकुमार गुजराल तिथे होते.
कुवेतमध्ये प्रवेश मिळणारे गुजराल पहिले विदेशी राजकीय नेते होते. गुजराल यांनी वकिलातीत बैठक बोलावली. त्यात १५-२० हजार भारतीय जमा झाले होते. त्यांच्या भारतात येण्याचा पूर्ण खर्च सरकार करेल, अशी घोषणा गुजराल यांनी त्यांच्यासमोर केली होती. यानंतर भारत सरकारने एअर इंडियाच्या विमान फेऱ्यांचे नियोजन केले. एअर इंडियाचे विमान कुवेतपासून एक हजार किमी अंतरावरील जॉर्डनपासून होते. त्यामुळे कुवेतमधून तिथपर्यंत पाेहोचण्यासाठी सरकारने इराकच्या एका कंपनीला कंत्राट दिले. दररोज बसमधून भारतीय जाॅर्डनमध्ये पोहोचत असत. हा बेस कॅम्प जॉर्डन सरकार, रेडक्रॉस आणि भारतीय वकिलातीने तयार केला होता. कुवेतमध्ये असा तळ नव्हता. वकिलातीमध्ये जवळपास ५० च्या आसपास अधिकारी होते. यातील २० बसरामध्ये आले होते आणि अन्य कुवेतमध्ये होते.

जॉर्डनमध्ये लोक कमी असल्यामुळे भारत आणि आसपासच्या दूतावासांतील आणखी ३० अधिकारी पाठवण्यात आले. दररोज भारतात जाणाऱ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांना विमानात बसवण्याचे काम ते करत असत. ज्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता त्यांना ओळखपत्र देण्यात आले होते. एअर इंडिया इंडियाची दररोज ६ ते ८ विमान उड्डाणे जॉर्डनहून दुबईला होत होती. त्यानंतर दुबईहून नियमित उड्डाणाद्वारे लोक भारतात परतले. ओळखपत्राचा पुरावा किंवा पासपोर्ट आदी कोणताही एनआरआय देऊ शकत नाही. त्या वेळी बहुतांश लोकांचे पासपोर्ट कुवेतमध्ये राहिले होते.
आक्षेप का?
अक्षय कुमारचा चित्रपट एअरलिफ्ट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यात अक्षय ज्या रणजित कात्यालची व्यक्तिरेखा साकारतो आहे तशी कुणी व्यक्ती मोहिमेत सहभागीच नव्हती, असे काही दावे आहेत. ही व्यक्तिरेखा काल्पनिक असल्याची चर्चा सुरू आहे.
- दुसरीकडे अक्षयने अनेक मुलाखतींत सांगितले की, ज्याची भूमिका तो करतो आहे त्या व्यक्तीची दिग्दर्शक राजा मेनन यांनी भेट घेतली आहे. कात्याल राष्ट्रीय नायकच व्हायला हवे होते, असेही अक्षय म्हणतो. मात्र, या विषयावर "भास्कर'शी बोलण्यास त्याने नकार दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अक्षयने काय टि्वट केले आणि सिनेमाच्या शूटिंगवेळी अक्षयचे फोटो...