आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रॉयल पॅलेसमध्ये झाले किम कार्दीशियनची बहीण आणि सुशांत सिंहचे Photoshoot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजा-महाराजांची भूमी असलेल्या राजस्थानमधील महाल हे जगभरात प्रसिद्ध आहेत. या प्रसिद्ध महालांपैकी एक असलेल्या सामोद पॅलेसमध्ये नुकतेच किम कर्दाशियनची बहीण आणि इंटरनॅशनल सुपरमॉडेल केंडल जेनरबरोबर सुशांतसिंह राजपूतने एका मॅगझिन कव्हरसाठी फोटोशूट केले आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो व्हारल जाले आहे. या महालाचे असे काय वैशिष्ट्य आहे की, देश विदेशातील लोक या महालाला भेट देतात, हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

येथे झाले बाजीराव मस्तानीचे शुटिंग 
- सामोद पॅलेस रावल शियो सिंहने तयार केला होता. तो अंबेरचा राजा पुथ्वीराजच्या कुटुंबातील होता. या महालात मोगलकालीन वास्तुशास्त्राचा नमुणा पाहायला मिळतो. 
- या वास्तुशास्त्रामुळेच इतर महालांच्या तुलनेत या महालाचे वेगळे वैशिष्ट्य उठून दिसते. 
- हा पॅलेस आता एका लक्झरी हॉटेलमध्ये रुपांतरीत झाले आहे. सुमारे 475 वर्ष जुन्या या महालात सामोद गार्डन, सामोद किल्ला आणि दरबार तंबू पाहण्यासारखे आहे. 
- येथे येणारे लोक त्यांच्या पाहुण्यांचे शाही पद्धतीने स्वागत करतात. 
- पॅलेसमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने डिझाइन करण्यात आलेल्या 19 खास खोल्या, 20 डीलक्स सुइट्स आणि 4 रॉयल सुईट्स आहेत. - बाजीराव मस्तानी चित्रपटाचे बहुतांश शुटिंग येथे करण्यात आले आहे. महालाचे सौंदर्य आणि येथे लावलेल्या लक्झरी वस्तुंमुळे या महालाची निवड करण्यात आली होती. 

संध्याकाळी असतो विंटेज लूक 
- संध्याकाळच्या वेळी सामोद महालाच्या विविध भागात केलेल्या रोषणाईमुळे याला विंटेज लूक मिळत असतो. 
- जगभरातील प्रसिद्ध लोक, उद्योगपती आणि इंडस्ट्रीयालिस्ट यांना थांबून वेळ घालवण्याची इच्छा असते. 
- शहरातील धावपळीपासून दूर असलेल्या याठिकाणच्या आलिशान रूम्स पाहुण्यांना भावत असतात. येथील सफारी लॉजही लोकांना चांगलेच आवडते. 
- हा पॅलेस याठिकाणी आलेल्या देशी-विदेशी पाहुणे, येथे होणारे कार्यक्रम यामुले नेहमी चर्चेत असतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सामोद पॅलेसमधील शूटचे आणि पॅलेसचे काही निवडक PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...