आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मीडियाने विचारला असा प्रश्न, भडकला सुशांत सिंग राजपूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी चित्रपट 'राबता'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी कृती सेनन, सुशांत सिंग राजपूत आणि इतर टीम उपस्थित होते. यावेळी सर्व टीम प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना 
काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, एका वरिष्ठ पत्रकाराने कुलभूषण जाधवला पाकिस्तानने फाशीची शिक्षा दिले जाण्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा निर्माता-दिग्दर्शक दिनेश विजेनने सांगितले की, अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही योग्य जागा नाही. यानंतर हाच प्रश्न जेव्हा सुशांत सिंह राजपूतला विचारला गेला तेव्हा त्याची आणि पत्रकाराची शाब्दिक बाचाबाची झाली. 
 
सुशांतचे म्हणणे होते की, "जर आम्हाला नेमके प्रकरण काय ते माहित नसेल तर यावर काहीही बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही." सुशांत नाराज झाल्याचे पाहून पत्रकाराने प्रश्नोत्तर 
तेथएच थांबविले पण तिथे असणारे दुसरे पत्रकार त्याच्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी कलाकारांनी देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले म्हणणे लोकांसमोर ठेवले पाहिजे, असे 
सांगितले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा काही फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...