आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CHAT: 'डिटेक्टिव बक्शीसाठी 8 महिने फोन, इंटरनेट आणि अंकितापासून दूर राहिलो'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सुशांत सिंह राजपूत)
मुंबईः या शुक्रवारी रिलीज झालेला 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी नुकतीच Divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. या दोघांनी यावेळी आमच्यासोबत सिनेमा आणि शूटिंगशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. मुलाखतीत सुशांतने सांगितले, की 'ब्योमकेश बक्शी'ची भूमिका साकारण्यासाठी त्याने खास ट्रेनिंग घेतले होते. सुशांतने एक महत्त्वाची गोष्टसुद्धा यावेळी शेअर केली. ती म्हणजे या भूमिकेसाठी सुशांत तब्बल 8 महिने फोन, इंटरनेट आणि गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेपासून दूर राहिला.
'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हे काल्पनिक पात्र आहे. या विषयावर सिनेमा बनवण्याचे मागील 20 वर्षांपासून डोक्यात होते, असे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी सांगितले. दिबाकर म्हणाले, ''मी गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर काम करतोय. अखेर आज हा सिनेमा बनून तयार आहे. ब्योमकेश हे काल्पनिक पात्र आहे, मात्र लोक त्याला खरेच समजतात.''
'काय पो छे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके' या सिनेमात झळकलेला सुशांत या सिनेमात नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सुशांतने म्हणाला, "प्रेक्षक एका वेगळ्याच रुपात मला या सिनेमात बघतील. 1940 च्या दशकातील लूकशी साधर्म्य साधणारा माझा लूक आहे. माझ्या चाहत्यांना सिनेमा आणि माझा लूक नक्की आवडेल, अशी मला आशा आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रमोशनसाठी divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसमध्ये पोहोचलेल्या सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीची खास छायाचित्रे...