आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुष्मिता सेन 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रितीक भसीनपासून झाली विभक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सुष्मिता सेन आणि रितिक भसीन यांच्या चार वर्षांच्या रिलेशनला ब्रेक लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुष्मिता आणि रितीक आता वेगळे झाले आहेत. एका लीडिंग डेलीच्या वृत्तानुसार, सुष्मिता आणि रितीक यांच्या काही मित्रांनी सांगितले आहे, की दोघे गेल्या 6 महिन्यांपासून वेगळे झाले आहेत. मात्र त्यांच्यात अजुनही चांगली मैत्री आहे, त्यामुळे ते काही सोशल इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. 

 

अनेक नाइट क्लबचा मालक आहे रितीक 
- 37 वर्षांचा रितीक भसीन याच्या मालकिचे अनेक नाइटक्लब आहेत. 42 वर्षांच्या सुष्मितासोबतच्या रिलेशनशिप आधी बराच काळ तो अंबिका खेतानसोबत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या नाइटक्लबवर छापा पडला होता. त्यावेळी पोलिसांसोबत गैरवर्तनाच्या आरोपात त्याला अटकही झाली होती. 
- रितीकचे शालेय शिक्षण यूएसमध्ये झाल्यानंतर कॉलेज त्याने मुंबईत केले होते. बी-टाऊनच्या अनेक सेलेब्ससोबत त्याची मैत्री आहे. अर्जुन कपूर, अभिषेक कपूरसह अनेक सेलेब्स त्याचे चांगले मित्र आहेत. त्यासोबतच टीव्ही इंडस्ट्रीमध्येही त्याचे अनेकांसोबत चांगले रिलेशन आहे. शशी थडानी, सनी सारासोबत एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी Orion Entertainment मध्ये त्याची पार्टनरशिप आहे. 
- सुष्मिताबद्दल सांगायचे झाल्यास, सुष्मिताचा फिल्मी करिअरचा ग्राफ फार चांगला राहिलेला नाही. मिस युनिव्हर्सचा ताज मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होती. 
- सुष्मिताने लग्नाशिवाय मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि ती 25 वर्षांची असताना रीनी या बेबी गर्लला तिने दत्तक घेतले होते. त्यानंतर 10 वर्षांनी तिने आणखी एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव अलीशा ठेवले आहे. 
- सुष्मिताने तिच्या आयुष्याबद्दल फार गुप्तता कधी पाळली नाही. तिच्या रिलेशनशिपबद्दलही ती मनमोकळी बोलते. रितीकआधी सुष्मिता रणदीप हुड्डा आणि विक्रम भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

बातम्या आणखी आहेत...