मुंबई - ऋतिक रोशन आणि सुझान खान या दाम्पत्यामध्ये काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्या नंतरही दोघे अनेक वेळा आपल्या मुलांसोबत एकत्र दिसले. दरम्यान, या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला, या बाबत उलट -सुलट चर्चा होत राहिली. पण, नेमके कारण समोर आले नाही. आता सुझान पहिल्यांदाच या बाबत स्पष्ट बोलली. तिने म्हटले, ''आमच्या सहजीवनाचा प्रवास अशा पायरीपर्यंत पोहोचला होता की, तिथून पुढे सोबत चालणे अशक्य होते. ते नाते बनावट होते.
अजून काय म्हटले सुझानने...
> एकेकाळी या दोघांची बॉलीवुडमधील 'परफेक्ट कपल' म्हणून ओळख होती. पण, त्यांच्यात दरी वाढत गेली.
> सुझान म्हणाली, ''आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आताही चॅट करतो. ''
>''आमच्या मुलांसाठी आम्ही नेहमीच एकमेकांचा सन्मान करतो. ''
कंगनाच्या वादात केला होता ऋतिकचा सपोर्ट
> काही दिवसांपूर्वी ऋतिक आणि कंगनाचा वाद विकोपाला गेला होता.
> त्यामुळे सुझानने ऋतिकची पाठराखण केली होती.
> ऋतिक आणि कंगना एकमेकांच्या मिठीत असतानाचा एक फोटो प्रकाशित करून दोघे प्रेमात असल्याचा दावा केला होता.
> त्याच्या दुसऱ्याच दिवशीच सुझानने ही एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यात कंगना, ऋतिक आणि ती स्वत: होती.
> लग्नाच्या 17 वर्षानंतर 13 डिसेंबर 2013 रोजी या दोघांनी घटस्फोट घेतला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हृतिकने सुझानला केले होते प्रपोज