आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइव्ह शोमध्ये ओम स्वामीला जनतेने झोडपले, महिलेला देत होता धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/दिल्लीः 'बिग बॉस 10'मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेल्या स्वामी ओमला एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह शोमध्ये जनतेचा मार खावा लागला. चॅनलने हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला असून तो बघता बघता सोशल नेटवर्किंग साइट्सवर वा-यासारखा पसरला आहे. 55 सेकंदांच्या या व्हिडिओत स्वामी ओमचा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेसोबत कसा वाद झाला आणि त्याने महिलेविरोधात कसा अपशब्दांचा वापर केला, हे स्पष्ट दिसत आहे. 

  ओम आणि पॅनलिस्टमध्ये झाला वादविवाद...
- व्हिडिओमध्ये, स्वामी ओम प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेविषयी आक्षेपार्ह विधान करताना दिसतोय.  
- ओमने महिला आणि तिच्या कुटुंबीयांना चर्चेत ओढले. पण गोंधळ झाल्याने ओमने नेमके काय म्हटले, हे स्पष्ट ऐकू येत नाहीये.  
- चॅनलच्या अँकरने स्वामीला महिलेविषयी असे विधान करणे योग्य नसल्याचे बजावले.  
- शोमध्ये स्वामी ओमच्या शेजारी बसलेला त्याचा एक समर्थक वारंवार जागेवरुन उठून संबंधित महिलेला धमकावताना दिसतोय. 
- शोमध्ये सहभागी झालेल्या संत समितीच्या काही सदस्यांना ओमच्या समर्थकांचे असे वागणे खटकले.  
- त्यांच्यापैकी एक संत उठला आणि त्या समर्थकाला मारहाण सुरु केली. बघता बघता सर्व संत आणि प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक ओम आणि त्याच्या समर्थला मारहाण करतात.  
- यावेळी स्वामी ओमला लोकांचा चांगला मार खावा लागला.  
- यावेळी स्वामी ओम स्टेजहून खालीसुद्धा पडला.  
 

न्यूज अँकरवर फेकले होते पाणी 
- स्वामी ओम 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडल्यापासून अनेक न्यूज चॅनल्सच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतोय.  
- गुरुवारी एका चॅनलवर जेव्हा अँकर त्याला प्रश्नोत्तरे करत होता, तेव्हा त्याने चिडून अँकरच्या तोंडावर पाणी फेकले होते.  
- हे कृत्य केल्यानंतर तो रडू लागला. 'बिग बॉस'च्या घरात अन्याय झाला आणि बाहेर पडल्यानंतरसुद्धा लोक त्याच्यावर अन्याय करत आहेत, असे तो ओरडू लागला होता. 

गेल्या आठवड्यात करण्यात आली होती बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी...  
- गेल्या आठवड्यात वीजे बानी आणि रोहन मेहरा यांच्यावर यूरिन फेकल्यानंतर बिग बॉसने स्वामी ओमला घराबाहेर काढले होते.  
- बिग बॉसने स्वामीला घराबाहेर जाण्याचे आदेश दिल्यानंतर तो घर सोडायला तयार नव्हता.  
- बिग बॉसने वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा स्वामी ओम घर सोडायला तयार नव्हता. अखेर सिक्युरिटी गार्ड्सना त्याला घराबाहेर काढावे लागले होते.  
 

बाहेर पडल्यानंतर स्वामीने सलमानला म्हटले होते ISI एजेंट 
- 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामी ओमने सलमान खानविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.  
- एका टीव्ही चॅनलवरील डिबेटदरम्यान स्वामी ओमने सलमानचा उल्लेख ISI एजेंट असा केला होता.  
- स्वामी ओमने म्हटले होते, "सलमान खान ISI एजेंट आहे आणि हिंदू संस्कृती त्याच्याविरोधात आहे.  बिग बॉसच्या घरात माझ्यासाठी ड्रग्स मिश्रित जेवण बनवले जात होते. त्यामुळे शोमध्ये माझे वागणे विचित्र होत असे."
- सलमानसोबत वैयक्तिक वाद आहे, तर मग लीगल अॅक्शन का घेत नाही, असा प्रश्न स्वामी ओमला विचारला असता, तो म्हणाला होता, की त्याने शोविरोधात FIR दाखल केली आहे.