Home »News» Tabu And Khurrana Have Already Begun Shooting For The Film In Lonavla And Pune

वयाने 13 वर्षे लहान अभिनेत्याबरोबर रोमान्स करणार तब्बू

दिव्य मराठी वेब टीम | Jun 18, 2017, 15:27 PM IST

  • वयाने 13 वर्षे लहान अभिनेत्याबरोबर रोमान्स करणार तब्बू
मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिेत्री तब्बून आगामी चित्रपट 'मुड-मुडकर ना देख' मध्ये अभिनेता आयुष्ममान खुराणासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आयुष्यमान तब्बूपेक्षा वयाने जवळपास 13 वर्षाने लहान आहे. या दोघांना सोबत पाहणे प्रेक्षकांसाठी वेगळाच अनुभव ठरणार आहे. श्रीराम राघवन यांच्या चित्रपटाचे हे टायटल 'श्री 420' या चित्रपटापासून प्रेरीत आहे.
चित्रपटाचे शूटिंह लोणावळा आणि पुणे येथे सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे 30 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. इतकेच नाही तर यावर्षी हा चित्रपट रिलीजही होणार आहे. तब्बू सध्या रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'गोलमाल ४' चे शूटिंग करत आहे. 'फितूर' या चित्रपटात तब्बू दिसली होती.

Next Article

Recommended