आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान आयुष्यमानबरोबर रोमान्स करताना दिसणार तब्बू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अॅक्ट्रेस तब्बू तिच्या 'मुड-मुडकर ना देख' चित्रपटात आयुष्यमान खुराणाबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. आयुष्मान तब्बूपेक्षा वयाने फार लहान आहे. त्यामुळे तिच्याबरोबर स्क्रीन शेयर करताना पाहणे फॅन्ससाठी फारच इंटरेस्टींग ठरणार आहे. श्रीराम राघवनच्या या चित्रपटाचे टायटल राजकपूर यांच्या 'श्री 420' चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावरून घेतलेले आहे. 

चित्रपटाचे शुटिंग लोणावळा आणि पुण्यात सुरू झाले असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे 30 % शुटिंग पूर्णही झाले आहे. एवढेच नाही तर, हा चित्रपट याचवर्षी रिलीजही होणार आहे. तब्बू सध्या रोहित शेट्टीच्या अपकमिंग 'गोलमाल 4' च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 'फितूर' हा तब्बूचा यापूर्वीचा चित्रपट होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅक्ट्रेस तब्बूचे काही PHOTOS..