आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी श्वेताला काय-काय देऊ शकतात अमिताभ, वाचा किती आहे त्यांच्याकडे संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या पश्चात संपत्तीचे समान वाटप आपल्या मुलांमध्ये करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या संपत्तीचे दोन समान भाग होतील. एक वाटा मुलगा अभिषेक याला तर दुसरा वाटा मुलगी श्वेता हिला मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्त्री पुरुष समानतेची सुरुवात आपल्या घरापासून करुन अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून तसा संदेशच दिला आहे. 
त्यांच्या या ट्विटनंतर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? आणि श्वेता-अभिषेकच्या वाट्याला किती संपत्ती येणार? याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

2800 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत बिग बी...
2015 साली अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता असल्याचे सांगितले गेले होते. तर 2016 मध्ये ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अभिनेते ठरले आहेत. त्यांची नेटवर्थ 42.5 कोटी डॉलर (सुमारे 2800 कोटी रुपये) आहे. 2016मध्ये फिल्म आणि जाहिरातींशिवाय त्यांनी होस्ट गेस्टच्या रुपात काम करुन 55 कोटींची कमाई केली होती. 

20 कोटी टॅक्स भरतात अमिताभ
कमाईसोबतच आयकर भरण्यातसुद्धा अमिताभ पुढे आहेत. ते दरवर्षी 6-10 कोटींचे आयकर रिटर्न भरतात. याशिवाय विविध कंपनी आणि कमाईच्या इतर स्त्रोतनुसार 7 ते 11 कोटींपर्यंत ते आयकर देतात. अर्थातच वर्षभरात त्यांनी 20 कोटींहून अधिक आयकर रिटर्न भरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिगं बंची वार्षिक कमाई ही 24 ते 30 कोटींपर्यंत असते.  

अमिताभ बच्चन यांची संपत्ती, त्यांचे कार कलेक्शन, सिनेमे आणि जाहिरातींमधून होणा-या कमाईविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर..  
बातम्या आणखी आहेत...