आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडचे तीन चित्रपट, ज्यांनी मिळवले बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('गब्बर इज बॅक'च्या एका दृश्यात अक्षय कुमार)
बॉक्स ऑफिसवर मागील काही आठवड्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी अपेक्षेपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. यामागे मौखिक आणि सोशल मीडियावर झालेल्या चर्चेचा मोठा वाटा आहे.
काही वर्षांपासून चित्रपटाची होणारी 'वर्ल्ड ऑफ माऊथ पब्लिसिटी' म्हणजे प्रेक्षकांचा आपआपसातील प्रचार ‌थंडावला असल्याचे सांगण्यात येत होतो. जेव्हा माऊथ पब्लिसिटी होते तेव्हा चित्रपटाच्या व्यवसायात तीनपट वाढ होत असल्याचे मानले जात होते. मात्र सध्या चित्रपटाचे हिट अथवा फ्लॉप हे रिलीजनंतर तीन दिवसांतच समजते. मात्र अलीकडेच रिलीज झालेल्या 'गब्बर इज बॅक' आणि 'पीकू'ने ही धारणा बदलली असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचप्रमाणे शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स'ने देखील महिला प्रधान चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळत नसल्याची धारणा खोडून काढली आहे.
मे च्या तळपणाऱ्या उन्हामध्ये बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटांनी गारवा निर्माण केला आहे. देशभरात 'तनू वेड्स..'च्या सकाळच्या शोमध्ये 20 टक्के प्रेक्षक उपस्थित राहिल्याने ओपनिंग व्यवसाय कोटींपर्यंत होईल, असे फिल्मी ट्रेडवरून ठरवले गेले. मात्र दुपारच्या शोसोबत प्रेक्षकांची सं‌ख्येमध्ये वाढ झाली. आयपीएलमधील धोनी आणि कोहलीच्या संघातील महत्त्वपूर्ण सामना देखील प्रेक्षकांना या चित्रपटाकडे वळण्यास रोखू शकला नाही. एकूणच या तीन चित्रपटांचा आठवड्यातील व्यवसाय समान आहे.
'गब्बर इज बॅक'
1st week 59 cr.
2nd week 21 cr.
3rd week 07 cr.
4th week 95 cr. (expected total)
समज होता : चित्रपट केवळ वीकेंडच्या तीन दिवसांमध्येच व्यवसाय करेल.
झाले असे : चौथ्या आठवड्यात चित्रपट 100 कोटींच्या जवळ पोहोचला.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, 'पिकू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स'विषयी...