आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी पायावर उभे राहणेही नव्‍हते शक्‍य, आज आहे ऐश्वर्या, दीपिका, प्रियांकाची योगा टीचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः देशभरात आज 'शिक्षक दिन' साजरा केला जातोय. या निमित्ताने आज आम्ही तुमची भेट अशा एका सेलिब्रिटी योगा शिक्षिकेसोबत घालून देतोय, जिने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींना योगा शिकवला आहे. एका अपघातात तिच्‍या पायांना गंभीर दुखापत झाली होती. आता तू कधीच स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकणार नाही, असे डॉक्‍टरांनी तिला सांगितले होते. पण, ती खचली नाही. आज तीच तरुणी देशातील प्रसिद्ध योग शिक्षिका आहे. आज शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत तिची संघर्ष गाथा....

ऐश्वर्यापासून प्रियांकापर्यंत अनेक सेलिब्रिटींना दिले योगाचे धडे...
 - ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, बिपाशा बसू, जॅकलिन फर्नांडिस आणि दीपिका पदुकोणसह अनेक हायप्रोफाइल लोकांना दीपिका अष्टांग योगाचे ती प्रशिक्षण देते. दीपिका मेहता असे तिचे नाव आहे.
- मुंबईत राहणाऱ्या दीपिकाला अनेक फिटनेस मॅगझिनने आपल्‍या मुख्‍यपृष्‍ठावर स्‍थान दिले आहे.
- 2014 मध्ये ती 'व्होग मॅगझिन'च्या कव्हर पेजवर झळकली होती.
- 2015 साली दीपिका 'एल इंडिया'च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या फिटनेस कॅम्पेनचा चेहरा होती.
- अतिशय प्रसिद्ध सेलिब्रिटी योग टीचरमध्‍ये तिचा समावेश होतो.
- 'योग सिटी' या टीव्‍हीवरील कार्यक्रमातून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.
- फिटनेस शो 'द बिगेस्ट लॉसर' ची ती मास्टर ट्रेनरही होती.
- संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्‍या 'टेडएक्स' इव्‍हेंटमध्‍ये दीपिकाने डान्‍स आणि योगचे एकत्रित सादरीकरण केले होते.

अपघाताने बदलले आयुष्‍य... 
- गिर्यारोहण करताना वर्ष 1997 मध्‍ये दीपिका 40 फूट खोल खाली पडली होती.
- त्‍यानंतर सलग दोन वर्षे ती बेडवरच होती. चालणे फिरणे बंद होते.
- उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनीही सांगितले की, आता दीपिका कधीच स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकणार नाही.

अशी वळली योगाकडे...
- बेडवरच राहून - राहून दीपिकाला कंटाळा येत होता. त्‍यातून वेळ घालवण्‍यासाठी तिने पुस्‍तकं वाचायला सुरुवात केली.
- त्‍यात योगावर आधारित पुस्‍तकं वाचल्‍याने ती योगाकडे आकर्षित झाली.
- बेडवर जमेल तशी ती योगा करत होती.
- दरम्‍यान डॉक्‍टरांचे प्रयत्‍न सुरूच होते.
- योगामुळे ती आपल्‍या पायावर उभी राहू शकली.
- त्‍यानंतर योगाचे प्रशिक्षिण घेण्‍यासाठी ती केरळला गेली. 
- केरळमधील शिवनंदन योग केंद्रात तिने प्रशिक्षण घेतले.

कॉर्पोरेट्स कुटुंबांना देते प्रशिक्षण
- दीपिका योग टीचिंगसोबतच शरथ जोइस आणि अष्टांग योगाचे अॅडव्हान्स ट्रेनिंगसुद्धा देते.
- दीपिका मुंबईत वास्तव्याला असून बांद्रा परिसरात ती योगा क्‍लास चालवते.
- सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट्स कुटुंबातील अनेकांच्‍या घरी जावून त्‍यांना योगाचे प्रशिक्षण देते.
- ती या हायप्रोफाइल लोकांना अष्टांग योग, डाएट आणि लाइफस्टाइलविषयी ट्रेनिंग देते.  

पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिकाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...