आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बुल्गारियाहून परतली टीम 'दिलवाले', एअरपोर्टवर झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शुकवारी (31 जुलै) शाहरुख खान, काजोल आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टमधून बाहेर पडताना स्पॉट झाले. शाहरुख आणि काजोल दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' सिनेमाचे बुल्गारिया शेड्यूल उरकून मुंबईला परतले आहेत. मागील दिवसांत टीमने डेड सीमध्येसुध्दा सिनेमाचे शूटिंग केले.
एअरपोर्टवर हे तीन स्टार्स कॅज्युअल लूकमध्ये क्लिक झाले. काजोल ग्रे टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसली. तिने आपल्या लूकला शेड्स आणि रेड स्नीकर्सने कम्पलिट केले. एसआरकेने व्हाइट टी-शर्ट, ब्राऊन जॅकेट आणि डेनिम परिधान केले होते. तसेच रोहित शेट्टी ब्लू आऊटफिटमध्ये स्पॉट झाला.
मागील दिवसांत टीमने बुल्गारियामध्ये Wrap-Up पार्टीसुध्दा एन्जॉय करताना दिसली होती. पार्टीमध्ये शाहरुख आणि काजोलने टीमसोबत धमाल-मस्ती केली. सिनेमांत काजोल-शाहरुखसोबत वरुण धवन आणि किर्ती सेननसुध्दा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'दिलवाले' या वर्षी 16 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या शाहरुख खान, काजोल आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीची झलक...
बातम्या आणखी आहेत...