आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तनु वेड्स मनु रिटर्न्स'चा ट्रेलर रिलीज, पाहा कशी दिसेल कंगना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये माधवनसोबत कंगना राणावत)

मुंबई- बॉलिवूडचा 'तनु वेड्स मनु' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री कंगना राणावत दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तसेच सिनेमात कंगनाशिवाय माधवनसुध्दा मुख्य भूमिकेत आहे.
ट्रेलरमध्ये कंगनाचे दोनही पात्र 'तनु' आणि 'दत्तो' दिसले आहेत. यामध्ये 'तनु' सुंदर आणि आकर्षक दिसत असून 'दत्तो'चा लूक अगदी मुलांसारखा आहे. तिची भाषासुध्दा हरियाणवी आहे. ट्रेलरमध्ये कंगनाशिवाय जिम्मी शेरगील आणि मआधवनसुध्दा दिसतील.
सिनेमा 2011मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु'चा सीक्वल आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा 22 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगनाचा सिनेमातील लूक...