Home »News» Teaser Of Upcoming Movie Tumhari Sulu Launched

'आपकी रातो को जगाने.. आपके सपनो को सजाने.. मै सुलू', भन्नाट आहे हा Teaser

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 12:33 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - विद्या बालनने बॉलिवूडमध्ये सध्या तिची स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण केली आहे. पुरुष प्रधान सिनेमांच्या गर्दीमध्ये विद्या बालनने केलेले बहुतांश चित्रपट हे महिला प्रधान असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांतच विद्याचा तुम्हारी सुलू हा चित्रपट येत आहे. विद्या आपल्याला या चित्रपटातून पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर काम करत असल्याचे पाहायला मिळणार आहे. मात्र तिचा अंदाज नेहमीप्रमाणेच कातील असेल हे चित्रपटाचा टिझर पाहून लक्षात येते. नुकताच या चित्रपटाचा टिझर समोर आला आहे, त्यातील विद्याचा अंदाज पाहून चित्रपट भन्नाट असणार याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग पाहुयात, टिझरमध्ये काय म्हणतेय 'तुम्हारी सुलू'.

पुढील स्लाइड्सवर पाहा. चित्रपटातील विद्या बालनचे काही Looks अखेरच्या स्लाइडवर पाहा Teaser...

Next Article

Recommended