आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : रिलीज झाला मधुर भंडारकरच्या \'कॅलेंडर गर्ल्स\'चा TEASER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'फॅशन', 'हीरोईन' यांसारखे महिला प्रधान सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या आगामी 'कॅलेंडर गर्ल्स' या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. 1.31 सेकंदांच्या या टीजरमध्ये मॉडेल्सच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत.
सिनेमाची कथा ही पाच सुंदर मॉडेल्स आणि त्यांच्या ग्लॅमरस जगावर आधारित आहे. या सिनेमाद्वारे आकांक्षा पुरी, अवनी मोदी, कायरा दत्ता, रुही सिंह आणि सतरुपा पाइन बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहेत. येत्या 7 ऑगस्टला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'कॅलेंडर गर्ल्स'च्या टीजरची झलक...