आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साउथ इंडियन टीव्‍ही अॅक्‍टरची आत्‍महत्‍या, वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 महिन्‍यांपूर्वीच प्रदीप यांचा पावनी रेड्डी यांच्‍याशी विवाह झाला होता. - Divya Marathi
6 महिन्‍यांपूर्वीच प्रदीप यांचा पावनी रेड्डी यांच्‍याशी विवाह झाला होता.
मुंबई- साउथ इंडियन टीव्‍ही अॅक्‍टर प्रदीप कुमार यांचा बुधवारी (3, मे) सकाळी 4 वाजता मृत्‍यू झाला. प्रदीप यांनी हैदराबाद येथील राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍येवळी त्‍यांची पत्‍नी घरात नव्‍हती. सहा महिन्‍यांपूर्वीच  प्रदीप आणि त्‍यांची पत्‍नी पावनी यांचा विवाह झाला होता. 
 
- प्रदीपच्‍या मृत्‍यूनंतर पोलिसांनी त्‍यांच्‍या घराची संपूर्ण तपासणी केली. मात्र त्‍यांना कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. 
- प्रदीपच्‍या आत्‍महत्‍येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र आर्थिक तंगीमूळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 
- पोलिस प्रदीपचे कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र याच्‍यांकडून अधिक माहिती मिळवत आहे. 
- प्रदीप तेलगू टीव्‍ही सिरियल्‍स 'सप्तः मातृका', 'सुमंगली' आणि पावनी 'अग्निपुउलू' या सिरियल्‍ससाठी ओळखले जातात.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...