आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब हल्ला : 'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'च्या गावातूनच भारतात दाखल झाले दहशतवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगवेळी सलमान खान, कबीर खान, हर्षाली मल्होत्रा, अतुल अग्निहोत्री, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष शर्मा)
मुंबईः पंजाबच्या गुरुदासपूरच्या दीनानगरात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 13 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पाच पोलिस शहीद झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी नरोवाल जिल्ह्यातील रहिवाशी होते तेथून ते भारतात दाखल झाले.
तुम्हाला जाणून आश्चर्य होईल, की सलमान खानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमात दाखवण्यात आलेले हे तेच नरोवाल ठिकाण आहे. नरोवाल पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील जिल्हा आहे. 'बजरंगी भाईजान' या सिनेमात मुन्नी उर्फ शाहिदाची भूमिका वठवणा-या हर्षालीचे कुटुंब नरोवाल येथील रहिवाशी असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले होते. सिनेमातील अनेक दृश्यांमध्ये नरोवालचा उल्लेख आढळतो.
सिनेमात नरोवालला सांगण्यात आले हिल स्टेशन
'बजरंगी भाईजान' या सिनेमाल नरोवालला हिल स्टेशनच्या रुपात सादर करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात हे ठिकाण हिल स्टेशन नसून येथे स्नोफॉलसुद्धा होत नाही. सिनेमात हे ठिकाण काश्मिरमध्ये उभे करण्यात आले होते. काश्मिरमध्येच दिग्दर्शकाने पाकिस्तान उभे केले. अनेक भागांचे शूटिंग पहलगाम आणि काश्मिरमधील इतर ठिकाणी झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या शूटिंगशी संबंधित छायाचित्रे...