आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण खेर यांचे वडील अनंतात विलीन, सास-यांच्या अंत्यसंस्कारात शोकाकूल दिसले अनुपम खेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांना पितृशोक झाला आहे. किरण खेर यांचे वडील ठाकुर सिंह यांचे मंगळवारी (8 नोव्हेंबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 103 वर्षे होते. चंदीगड येथे त्यांच्या मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंदीगड येथील सेक्टर 8च्या कोठी नंबर 65 मध्ये ते वास्तव्याला होत्या. भोग आणि अंतिम अरदास 12 नोव्हेंबरला...
- वडिलांना अखेरचा निरोप देताना किरण खेर यांचा अश्रुंचा बांध फुटला होता.
- यावेळी किरण खेर यांचे पती अनुपम खेर उपस्थित होते.
- कर्नल सिंह यांच्या भोग आणि अंतिम अरदासची विधी 12 नोव्हेंबर रोजी सेक्टर 8च्या गुरुद्वारा साहिबमध्ये होणारेय.
मंगळवारी सकाळी अनुपम खेर यांनी ट्विट करुन सांगितले होते, "किरण खेर यांचे वडील कर्नल ठाकुर सिंह आज (मंगळवार) सकाळी हे जग सोडून गेले. माझ्या आयुष्यात मी जेवढे दयाळू व्यक्ती पाहिले, त्यापैकी ते एक होते. त्यांची उणीव कायम भासेल."
पुढील स्लाईडमध्ये बघा, संबंधित छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...