आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षांचा झाला अक्षय खन्ना, सावत्र आई-बहीणभावांसोबत आहे घनिष्ठ नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

[फोटोमध्ये वडील विनोद खन्ना आणि थोरला भाऊ राहुल खन्नासोबत अक्षय खन्ना(डावीकडे)]
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आज वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 मार्च 1975 रोजी अभिनेता विनोद खन्ना यांच्या घरी अक्षयचा जन्म झाला. त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.
जाणून घेऊया अक्षय खन्नाविषयी...
अक्षयची कौटुंबिक पार्श्वभूमी
अक्षय खन्ना ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा आहे. अक्षयच्या मोठ्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे. दोघेही भाऊ विलिंगटन स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आहेत. राहुल आणि अक्षय विनोद खन्ना आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. अक्षयची आई गितांजली त्याकाळातील प्रसिद्ध मॉडेल होत्या. विनोद आणि गितांजली आणि 1985 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर 1990 मध्ये विनोद खन्ना यांनी कविता खन्नासोबत लग्न केले. कविता आणि विनोद खन्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. साक्षी खन्ना हे त्यांच्या मुलाचे तर श्रद्धा खन्ना हे मुलीचे नाव आहे. अक्षयचा थोरला भाऊ राहुल खन्नासुद्धा अभिनेता आहे. अक्षय आणि राहुलचे त्यांच्या सावत्र आई आणि बहीणभावासोबत घनिष्ठ नाते आहे. अनेक ठिकाणी हे दोघेही कविता खन्नासोबत दिसतात.
फिल्मी प्रवास...
नमित कपूर अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर अक्षयने 1997 मध्ये 'हिमालय पूत्र' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमाची निर्मिती अक्षयच्या वडिलांनीच केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर 1997मध्ये जेपी दत्ता यांचा 'बॉर्डर' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील अक्षयच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सिनेमासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शिवाय सहायक अभिनेता म्हणून नामांकनदेखील मिळाले. अक्षयने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आत्तापर्यंत ताल, दिल चाहता है, हलचल, रेस, हमराज आणि गांधी माय फादर या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अक्षयची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे...