आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावतीच्या समर्थनार्थ पुढे आले कमल हासन, म्हणाले- दीपिकाचे शीर सुरक्षित राहायला हवे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दीपिका पदुकोन, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर स्टारर 'पद्मवती'चा वाद काही थांबायला तयार नाही. करणी सेना, भारतीय जनता पक्ष (भाजप), विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि काँग्रेस या सर्वांनीच पद्मावतीला विरोध सुरु केला आहे. यामुळे 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान संजय लीला भंसाळींच्या या चित्रपटाच्या समर्थनार्थ इंडस्ट्रीचे काही लोक समोर आले आहेत. त्यात आता कमल हासन यांनीही पद्मावतीला पाठिंबा दिला आहे.  

 

काय म्हणाले कमल हासन 
- देशातील सध्याची सर्वाधित चर्चित फिल्म पद्मावतीच्या वादावर साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विशेषतः जेव्हा दीपिकाचे आणि भंसाळींचे शीर कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहे, यावर कमल हसन म्हणाले, 'दीपिकाचे शीर सुरक्षित राहिले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. दीपिकाच्या शरीरापेक्षा तिचा अधिक सन्मान केला पाहिजे, त्याही पेक्षा तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान झाला पाहिजे. काही कम्यूनिटीजनी माझ्याही फिल्मला विरोध केला होता. कोणत्याही गोष्टीची अती चर्चा चांगली नाही. भारताने आता जागे झाले पाहिजे. हिच खरी विचार करण्याची वेळ आहे. आम्ही खूप काही सांगितले, आता भारतमातेचे ऐकले पाहिजे.' 

 

कोणी दिली दीपिकाचे नाक छाटण्याची धमकी...
- काही दिवसांपूर्वीच एका राजपूत नेत्याने डायरेक्टर संजय लीला भंसाळीचे शीर कापून आणणाऱ्याला 5 कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली होती.
- करणी सेनेने दीपिकाचे नाक छाटण्याची धमकी दिली आहे. 
- भाजपचे हरियाणा येथील चीफ मीडिया-को ऑर्डिनेटर कुंवर सूरजपाल अमु यांनी दीपिका पादुकोन आणि संजय लीला भंसाळी यांचे शीर कलम करणाऱ्यांना 10 कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...