आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अब्बास–मस्तान यांच्या ‘नकाब’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री उर्वशी शर्मा दुस-यांदा आई झाली आहे. उर्वशी शर्मा आणि तिचे पती अभिनेता सचिन जोशी यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी उर्वशीने गोंडस बाळाला जन्म दिला. गुरुवारी (30 नोव्हेंबर) तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. उर्वशी आणि सचिन यांचे हे दुसरे बाळ असून, त्यांना तीन वर्षांची समायरा ही मुलगीही आहे. रुग्णालयातून घरी परतताना सचिन आणि उर्वशीने आपल्या दोन्ही मुलांसह फोटोग्राफर्सना पोज दिली. यावेळी सचिन आपल्या तान्हुल्याची काळजी घेताना दिसले.  


ऑक्टोबर महिन्यात झाले होते उर्वशीचे डोहाळे जेवण... 
- अलीकडेच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात उर्वशीच्या सासू-सास-यांनी पुण्यात तिचे थाटात डोहाळे जेवण केले.
- यावेळी उर्वशी अतिशय सुंदर दिसली होती. 
- या कार्यक्रमाला उर्वशी आणि सचिनच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती.
- क्रिकेटपटू श्रीसंत पत्नी आणि मुलीसोबत या कार्यक्रमात पोहोचला.

 

लग्नानंतर उर्वशीने बदलेले नाव...
- 2012 साली उर्वशीने सचिन जोशीसोबत लग्न केले. 
- या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी असून तिचे नाव समायरा आहे. 
- लग्नानंतर उर्वशीने नाव बदलून रैना जोशी असे ठेवले आहे.
- रैनाचे पती सचिन JMJ ग्रुपचे व्हाइज चेअरपर्सन असून त्यांची कंपनी गोवा ब्रॅण्डच्या तंबाखूची निर्मिती करते.
- तंबाखूच्या बिझनेससोबतच सचिन विकिंग मीडिया अँड एन्टरटेन्मेंट या प्रॉडक्शन कंपनीचे मालक आहे.

 

या चित्रपटांमध्ये झळकली आहे रैना...
- उर्वशी उर्फ रैनाने अब्बास मस्तान यांच्या 'नकाब' (2007) या चित्रपटातून डेब्यू केले होते. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि बॉबी देओल लीड रोलमध्ये होते. 
- याशिवाय ती 'बाबर'(2009), 'खट्टा-मीठा'(2010), 'आक्रोश'(2010) आणि 'चक्राधार'(2012) या चित्रपटांमध्ये झळकली आहे. 
- उर्वशीने 'थ्री' (2008) या तेलुगु चित्रपटातही अभिनय केला. 
- तर सचिन अजान, मुंबई मिरर आणि जॅकपॉट या चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

 

अर्ध्यावर सोडली होती उर्वशीने मालिका... 
- 2012 मध्ये सचिनशी लग्न केल्यानंतर कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून तिने चित्रपटसृष्टीपासून थोडे दूर राहणे पसंत केले. 
- यानंतर ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. 
- या मालिकेत 1970 ते 80 च्या दशकातील मुंबईतील डॉनची भूमिका तिने साकारली होते. पण या मालिकेचे अधिकतर चित्रीकरण हैदराबादमध्ये होत होते. यामुळे आपल्या चिमुकलीकडे लक्ष देणे आणि फार काळ तिच्यापासून लांब राहणे शक्य नसल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

 

किंगफिशर व्हिलाचे मालक आहे सचिन जोशी...
- सचिन जोशींनी विजय माल्ल्याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून काही दिवसांपू्र्वीच खरेदी केला. 
- तब्बल 73 कोटींची बोली सचिन यांनी या बंगल्यासाठी लावली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, नवजात बाळासोबत क्लिक झालेले उर्वशी-सचिन यांचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...