आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’साठी जमली या सेलिब्रिटींची भट्टी, शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुचर्चित गोलमाल या सिनेमाच्या पुढच्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. पण आता ही उत्सुकता संपली आहे. कारण रोहित शेट्टीने या सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा केली असून यानिमित्ताने अजय देवगण आणि रोहित पुन्हा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. आज (14 मार्च) रोहित शेट्टीचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजय देवगणने सिनेमातील स्टारकास्टचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन  त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’ या धमाल विनोदी सिनेमांनंतर आता या सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अभिनेत्री तब्बू, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

पुढील स्लाईड्सवर बघा,  ‘गोलमाल अगेन’च्या सेटवरील आणखी काही छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...