आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे करिश्मा कपूरच्या एक्स हसबंडची तिसरी पत्नी, उद्योगपती विक्रम चटवाल होता पहिला पती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करिश्मा कपूरचा पुर्वाश्रमीची पती संजय कपूर आणि त्याची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांचा एक फोटो अलीकडेच समोर आला आहे. हा फोटो प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या फोटोत हे कपल सेल्फी घेताना दिसत आहेत. फोटो शेअर करुन प्रियाने कॅप्शन दिले, “Working on our selfie pose #selfiefridaynight #selfiejunkie #selfie #selfieaddict” 

 

संजय आणि प्रिया मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हे संजयचे तिसरे तर प्रियाचे दुसरे लग्न आहे. संजयपू्र्वी प्रियाचे लग्न उद्योगपती विक्रम चटवालसोबत झाले होते. तिचे स्वतःचे ऑनलाइन फॅशल वेंचर आहे. याचवर्षी संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात संजय आणि प्रिया यांनी लग्न केले. घटस्फोटानंतर आता करिश्मासुद्धा दुसरा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. उद्योगपती संदीप तोषनीवालसोबत करिश्मा लवकरच लग्न करणार आहे. याच महिन्यात संदीप तोषनीवाल त्याच्या पत्नीपासून कायदेशीररित्या विभक्त झाला आहे.


पाहुयात, संजय आणि प्रिया यांच्या लग्नाचे निवडक PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...