Home »News» The Film Is Set To Release This October 2017

हैदराबादला पोहोचली 'गोलमाल अगेन'ची टीम, चित्रपटाचे टायटल साँग होणार शूट

दिव्य मराठी वेब टीम | Aug 09, 2017, 16:30 PM IST

मुंबई - 'गोलमाल अगेन' ची पूर्ण टीम काही दिवसींपूर्वी हैदराबादला रवाना झाली होती. रोहीत शेट्टीच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमाचे टायटल ट्रॅक तिथे शूट होणार आहे. यासाठी अजय देवगन, परिणीति चोप्रा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, तब्बू आणि डायरेक्टर रोहित शेट्टी हे सर्व हैदराबादेत दाखल झाले आहेत.
हा ट्रॅक ब्रिजेश शांडिल्य याने गायले आहे. हे गाणे त्याने कम्पोज केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्यात कार्निव्हलचा सेट तयार करण्यात आला आहे. यात एक हजारहून जास्त डांसर्स घेऊन गाणे शूट करण्यात आले आहे. गणेश आचार्यने गाणे कोरिओग्राफ केले आहे.
पुढच्या स्लाईडवर वाचा, सेटवरील अजून 3 फोटोज्..

Next Article

Recommended