आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला फस्ट लूक, 'अजहर'मध्ये या अंदाजात दिसेल इमरान हाश्मी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('अजहर'च्या फस्ट लूकमध्ये इमरान हाश्मी)
मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीन याच्या जीवनावर आधारित 'अझहर' चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी अझहरची मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये अझहरच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची झलक स्पष्टपणे दिसत आहे. अझहरप्रमाणे इम्रानने गळ्यात ताईत घातलेला असला तरी अझहर दाढी ठेवत नव्हता, हा फरक या लूकमध्ये दिसेल.
एकता कपूरच्या प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन टोनी डिसुजा यांनी केले आहे. या सिनेमासाठी इमरानने अझहरुद्दीनकडुन क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
या सिनेमात अझहरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेसाठी नर्सिग फाखरीची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...