आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टुंडट ऑफ द इयर: फर्स्ट पोस्टर झाले रिलीज, कॅज्युअल रुपात दिसला टायगर श्रॉफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिग्दर्शक करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट हिट ठरला होता.  सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, अलिया भट या तीन नवीन चेह-याची या चित्रपटात भट्टी जमली होती. चित्रपटाला मिळालेली तरुणांची पसंती पाहून करण जोहरने चित्रपटाचा सिक्वेल बनवायचा निर्णय घेतला. करणने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच शेअर केलाय. यात तो टायगर श्रॉफ या नव्या 'स्टुडंट'ची शाळा घेणार आहे. पोस्टरवर आजच्या तरुणाईच्या 'कूल' अंदाजात टायगर झळकतोय. नव्या जमान्याला साजेशा अशा 'ट्रेंडी लूक'मध्ये हे पोस्टर आहे. पोस्टरवरचा 'अॅडमिशन्स ओपन'चा संदेश आणि त्याखाली असलेला चषक पाहून या चित्रपटातही ‘स्टुडंट ऑफ द इयर' चषकासाठी चुरशीची स्पर्धा रंगणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

 

या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. पण याविषयी अद्याप दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आता टायगरसोबत आणखी कोणकोणते कलाकार करण जोहरच्या या चित्रपटात झळकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...