Home »News» The Jaadu Ki Jhappi Man Munna Bhai MBBS

'मुन्ना भाई MBBS' मधून प्रसिद्ध झाला हा अॅक्टर, सध्या राहतो या 'गुहेमध्ये'

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 09:26 AM IST

भोपाळ - 'मुन्ना भाई एमबीबीएस' मधील हॉस्पिटलमधला जादू की झप्पीचा सीन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. यात स्वच्छता करणाऱ्या एका म्हाताऱ्याला संजय दत्त जादू की झप्पी देत असल्याचे दाखवले आहे. पण ही भूमिका साकारणाऱ्या सुरेंद्र राजन यांच्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.

सध्या हिमालयात राहतात..
- 75 व्या वर्षी सुरेंद्र राजन शहर सोडून हिमालयाच्या नैसर्गिक परिसरात राहत आहेत.
- गेल्या चार वर्षांपासून उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हिमालयातील सर्वात शेवटचे गाव खुन्नूमध्ये ते राहत आहेत.
- चार वर्षे जगापासून दूर राहिल्यानंतर काही महिन्यांनी ते शहरात परतले आहेत.
- भारत भवनच्या निर्मितीच्या काळात मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागात दोन वर्षे ओएसडी पदावर राहिल्याने त्यांना भोपाळबद्दल चांगलीच आपुलकी आहे.
- गेल्या 40 दिवसांपासून ते भोपाळमध्ये राहत आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी त्यांच्या जीवनशैलीबाबत सांगितले आहे.
- सुमारे 70 पेक्षा अधिक चित्रपटांत लहान मोठ्या भूमिका करणारे सुरेंद्र चित्रकार आणि फोटोग्राफर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांची फिरण्याची आवड आणि बिनधास्त जगण्याची पद्धत हैराण करणारी आहे.

गुहेत फक्त गरजेपुरते सामान
- सुरेंद्र हिमालयात दगडांपासून बनलेल्या एखा खोलीच्या घरात राहतात. एका निवृत्त सैनिकाकडून त्याने ते घर मागितले आहे.
- तो सैनिक त्या घरात चहाचे दुकान चालवायचा. या गावात जाण्यासाठी सुमारे 17 किलोमीटर डोंगर चढून जावे लागले. त्यामुळे तीन-चार महिन्यांतून एकदा शहरात येऊन चे सामानाची खरेदी करतात.
- झऱ्यांमधून पाण्याची व्यवस्था होते. शिवाय जवळ एक नदीही आहे.

सोबत नेता येईल ते घेऊन जातो..
- सुरेंद्र सांगतात, लोकांना माझे जीवन विचित्र वाटते. पण फक्त पैशामागे धावणे मला विचित्र वाटते. मी कधीही करिअरसारख्या गोष्टीवर विचार केला नाही. स्वतःसोबत वर नेता येतील तेवढ्याच गोष्टी जमवणार हे मी ठरवले होते.
- मी आता 80 वर्षांचा आहे. त्यामुळे मी जीवन योग्य पद्धतीने जगलो असे म्हणू शकतो.
- प्रत्येक जण माझ्यासारखा हिमालयात येऊन राहू शकत नाही. समाज, जबाबदारी असते. पण तुम्हाला धाडसी काही करायचे असेल तर जगायचे कसे हे मी सांगू शकतो. निसर्गाच्या सानिध्यात मला माझ्या गरजेचे सर्वकाही मिळते.

अॅक्टर नाहीं, पण चित्रपट हा कमाईचा मार्ग
- मी अॅक्टर नाही, पण चित्रपटांतील भूमिकांसाठी मला भरपूर पैसे मिळायचे ही चांगली गोष्ट आहे. या कमाईसाठी कॅनव्हास खरेदी करण्याची गरज नाही किंवा रंग लावण्याचीही गरज नाही.
- त्या पैशांमधून मी फिरायला जायचो. ज्या चित्रपटांत काम केले त्यापैकी अनेकांची नावेही माहिती नसायची किंवा कधी पाहायलाही गेलो नाही. पण 'मुन्ना भाई एमबीबीएस' पाहिला.

16 वर्षे कार हेच माझे घर होते
- मला जीवनाचे सत्य फार पूर्वीच कळले होते. त्यामुळे मी संपूर्ण जीवन फिरत फिरतच जगलो. कमाईही तेवढीच केली जेवढी मला फिरण्यासाठी गरजेची वाटली.
- मी देशातील प्रत्येक कोपऱ्यासह हंगेरी, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांत महिनो महिने फिरलो आहे. फिरण्याच्या आवडीमुळे मी 16 वर्षे घरही घेतले नाही.
- मी कारमध्येच राहायचो, आणि देशभरात फिरत असायचो. चित्रपटांत काम करताना मुंबईत भाड्याच्या घरात राहायचो.
- जवळपास 40 च्या वयात मी विचार केला होता की, 75 व्या वर्षी शहर सोडून मी हिमालयात जाईल. चित्रपटांत भूमिकांसाठी आजही अनेक लोक मला शोधतात.

बातम्यांनी विचलित होतो, म्हणून काही पाहत नाही
- मी फार संवेदनशील व्यक्ती आहे. देशासह जगातील काही बातम्या पाहून मी विचलित होतो.
- मी गेल्या 10 वर्षांपासून पेपर पाहिलेला नाही, चार वर्षांपासून टीव्ही इंटरनेट सर्वांपासून दूर आहे.
- गावात कधी तरी नेटवर्क आले तर फेसबूकवर मित्रांच्या पोस्ट वाचायचो. पण आता हिमालयात अशा पोस्ट अशांती पसरवतात, त्यामुळे आता त्यापासूनही दूर गेलो आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुरेंद्र राजन यांचे काही PHOTOS..

Next Article

Recommended