आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'The Jungle Book\' Has Collected 40 Crore Rupees At First Weekend

\'की अँड का\'वर भारी पडला \'द जंगल बुक\', पहिल्या आठवड्यात कमावले 40 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'द जंगल बुक' या हॉलिवूड सिनेमाने भारतात धमाकेदार ओपनिंग केली आहे. शुक्रवारी (8 एप्रिल) रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याची माहिती देत टि्वट केले, '#TheJungleBook emerges 2nd BIGGEST OPENING WEEKEND of 2016, after #Airlift. Fri 10.09 cr, Sat 13.51 cr, Sun 16.59 cr. Total: ₹ 40.19 cr nett'
पहिल्या आठवड्यातच 'की अँड का'च्या जवळ पोहोचला...
- 'द जंगल बुक' सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 'की अँड का'च्या आतापर्यंत कमाईच्या जवळपास कमाई केली आहे. अर्थातच 'द जंगल बुक' 'की अँड का'वर भारी पडला.
- 1 एप्रिलला रिलीज झालेला अर्जुन कपूर आणि करीना कपूर स्टारर 'की एंड का' सिनेमाने दुस-या आठवड्यापर्यंत 45 कोटींची कमाई केली.
- पहिल्या वीकेंड कलेक्शनच्या बाबबीत 'द जंगल बुक' हिंदी सिनेमा नसूनदेखील बॉक्स ऑफिसवर दुस-या क्रमांकावर आहे.
- पहिल्या क्रमांकावर अक्षय कुमार स्टारर 'एअरलिफ्ट' आहे. 22 जानेवारीला हा सिनेमा रिलीज झाला होता. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 44 कोटींची कमाई केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबबीत बॉलिवूडमधील टॉप-10 सिनेमे कोणते आहेत...