आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी झाला होता नीरजाचा छळ, दोन महिन्यांतच नव-याने सोडली होती साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री सोनम कपूर स्टारर नीरजा हा सिनेमा 19 फेब्रुवारी रिलीज होतोय. Pan Am 73 या फ्लाइटची हेड पर्सन राहिलेल्या नीरजा भनोटच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. 5 सप्टेंबर 1986 रोजी दहशतवाद्यांनी तिची हत्या केली होती. आपल्या प्राणाची आहुती देऊन 360 लोकांचे प्राण वाचवणा-या नीरजाच्या वैवाहिक आयुष्याविषयी फारसे कुणाला ठाऊक नाहीये. नीरजाचे वडील हरीश यांनी 1986 मध्ये एका वृत्तपत्राला आपल्या लेकीच्या वैवाहिक आयुष्याविषयी सांगितले होते. हुंड्यासाठी व्हायचा नीरजाचा छळ, जेवायला मिळत नसे...

नीरजाचे वडील हरीश भनोट यांनी मुलाखतीत सांगितले होते, की मार्च 1985 मध्ये नीरजाचे लग्न एका बिझनेसमनसोबत झाले होते. तिचे अरेंज्ड मॅरेज होते. लग्नात हुंडा दिला जाणार नाही, हे लग्नापूर्वीच निश्चित झाले होते. मात्र लग्नानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला. एक गरीब व्यक्तीसुद्धा लग्नात मुलीला बरेच काही देतो, असे टोमणे तिला सासरचे लोक मारायचे. लग्नानंतर काही दिवसांनी नीरजा नव-यासोबत गल्फला गेली. मात्र दोन महिन्यांतच त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले. तिला तिथे जेवण आणि पैसे मिळत नसे. त्यामुळे दोन महिन्यांत तिचे पाच किलो वजन कमी झाले. इतकेच नाही तर नीरजाला फोन करण्यासाठीही नव-याकडे पैसे मागावे लागत असे.

मॉडेलिंगच्या करारासाठी मुंबईत आली, मात्र परत गेली नाही...
नीरजा एका मॉडेलिंगच्या करारासाठी मुंबईत आली होती. याकाळात तिच्या नव-याने तिला एक पत्र लिहिले, त्यामध्ये सासरी परतण्यासाठी नीरजाकडे काही अटी ठेवण्यात आल्या. या पत्रात असेही म्हटले गेले होते, की स्वबळावर परतायचे असेल तर परत ये. नाही तर आपण वेगळे होऊयात. शिवाय तिच्या शिक्षणावरुनही पत्रात तिला टोमणे मारण्यात आले होते. नीरजा फक्त ग्रॅज्युएट आहे, असे पत्रात म्हटले गेले होते. नीरजाला हे सर्व सहन झाले नाही आणि तिने Pan Amमध्ये अटेंडंटच्या नोकरीसाठी अप्लाय केले. या जॉबसाठी जवळजवळ दहा हजार अप्लिकेशन्स आले होते. मात्र नीरजाने टॉप 80 मध्ये स्थान पटकावले.
नीरजा म्हणायची, काहीही झाले तरी नव-याची सावली माझ्यावर पडू देऊ नका...
Pan Am मधील तिच्या काही मित्रांना तिच्या लग्नाविषयी ठाऊक होते. त्यांच्या मते, नीरजा नेहमी म्हणायची, की जर कधी काही घडले तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, माझ्या नव-याची सावली माझ्या मृतदेहावर कधीही पडू देऊ नका.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नीरजाची काही छायाचित्रे....