आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाच्या भांगातील कुंकू संजय दत्तच्या नावाचे? जाणून घ्या या व्हायरल बातमीमागचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः   बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या भांगातील कुंकू हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाने भांगात कुंकू भरतात असे बोलले जाते. मात्र रविवारपासून एक वेगळेच वृत्त वा-यासारखे पसरले आहे.  रेखा या अभिनेता संजय दत्तच्या नावाचे कुंकू भरत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या वृत्ताला दुजोरा देण्यासाठी अनेकांनी यासाठी यासिर उस्मान यांच्या 'रेखा- द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. 

किती आहे या बातमीत तथ्य... 
यासिर उस्मान यांच्या 'रेखा- द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात रेखा आणि संजय दत्त यांनी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात असा कुठलाही उल्लेख पुस्तकात नसल्याचे स्वतः यासिर उस्मान यांनी म्हटले आहे. dainikbhaskar.com ला दिलेल्या मुलाखतीत यासिर यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. ते म्हणाले, ''हे वृत्त चुकीचे आहे. माझ्या पुस्तकात असे काहीच लिहिलेले नाही. लोकांनी हे पुस्तक व्यवस्थित वाचलेले नाही.'' 

यासिर पुढे म्हणाले, ''रेखा आणि संजय यांनी 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमीन आसमान’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याचवेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. इतकेच नव्हे तर तेव्हा दोघांनी लग्न केल्याची देखील चर्चा होती. या अफवा इतक्या प्रमाणात पसरल्या की एका मासिकाच्या मुलाखतीतून संजयने सदर वृत्तांचे खंडण केले होते. त्याने अधिकृतरित्या सर्व अफवांना नाकारले होते. ही त्याकाळातील गोष्ट आहे, जेव्हा रेखा संजय दत्तला त्याच्या वाईट काळातून बाहेर पडण्यास मदत करत होती. ''  

रेखाचे लग्न दिल्ली बेस्ड बिझनेमन मुकेश अग्रवालसोबत झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव संजय दत्तशिवाय अनेक जणांशी जुळले होते. वाचा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...