आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70व्या बर्थडेला कबीर बेदीने 29 वर्षे लहान परवीनसोबत थाटला संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर बेदी आणि  परवीन दुसांज - Divya Marathi
कबीर बेदी आणि परवीन दुसांज
 
मुंबई. कबीर बेदीने  परवीन दुसांजसोबत चौथे लग्न केले आहे. नातेवाईक आणि काही परिचीत लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. दोघे दहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 16 जानेवारीला कबीरचा वाढदिवस होता. 
 
बर्थडेच्या दिवशी लग्नाची घोषणा करून दिले सरप्राइज...
- लग्नात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, \'मुंबईमध्ये कबीरच्या बर्थडे पार्टीत येण्याची आमंत्रण मिळाले होते. त्यामध्ये लंडन, अमेरिका, दुबई, मलेशिया आणि यूरोपहून त्याचे मित्र आलेले होते.\'
- निमंत्रण पत्रिकेत लिहिलेले होते, \'कबीर बेदी- परवीन दुसांज तुम्हाला कबीरच्या बर्थडेचे आमंत्रण देत आहेत. सूफी प्रोग्रामसाठी लवकर या.\'
- प्लान होता, की सूफी गाण्यांमध्ये कबीर (70 वर्षे) आणि परवीन (41 वर्षे) लग्नाची घोषणा करणार. 
- कबीर यापूर्वी प्रोतिमा, सुसान हम्फ्रेस आणि निक्कीसोबत लग्नगाठीत अडकला होता. 
 
कुठे केले लग्न? 
- मिळालेल्या माहितूनुसार, \'बर्थडे सेलिब्रेशनच्या एका दिवसापूर्वी 15 जानेवारीला कबीरचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र गेटवे ऑफ इंडियाहून स्पीडबोटने अलीबागला गेले होते.\'
- तिथे एका फॅमिली मेंबरच्या घरी दोघांनी लग्न केले आणि आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 
- लग्नानंतर दोघे आशीर्वाद घेण्यासाठी गुरुव्दारमध्येसुध्दा गेले होते. 
 
कबीरने 6 वर्षांपूर्वी लग्नासाठी प्रपोज केले होते... 
-  इंग्रजी वर्तमानपत्र, हिंदुस्तान टाइम्ससोबत बातचीत करताना कबीरने सांगितले, \'परवीन आणि मी मागील दहा वर्षांपासून सोबत आहोत. यावेळी लग्न करण्याचा पूर्ण निर्णय परवीनचा होता.\'
- \'मी रोममध्ये 6 वर्षांपूर्वी परवीनला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती तयारसुध्दा झाली होती. परंतु सस्पेन्स ठेवला, की आम्ही कधी लग्न करणार आहोत.\'
- \'माझ्या या बर्थडेला संपूर्ण कुटुंबीय एकत्र येणार होते आणि परवीनने सर्वांमध्ये लग्नाची घोषणा केली. लग्न माझा नातेवाईक दीपक आणि सोहनी तन्ना यांच्या ब्रीच-फ्रंट घरी झाले.\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लग्नाचे फोटो...