आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेरठ-मुजफ्फरनगरमध्ये होत नाहीये 'शोरगुल'चे स्क्रिनिंग, दंगलीवर आधारित आहे सिनेमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शोरगुल' सिनेमाच्या एका सीनमध्ये जिमी शेरगिल - Divya Marathi
'शोरगुल' सिनेमाच्या एका सीनमध्ये जिमी शेरगिल
मेरठ: उत्तरप्रदेशच्या मेरठ आणि मुजफ्फरनगरच्या थिएटर मालकाने दंगलीच्या शंकेने 'शोरगुल' सिनेमाचे स्क्रिनिंग करण्यास नकार दिला आहे. केवळ आग्र्यात एक आणि बरेलीमध्ये दोन शो चालवले जाणार आहेत. हा सिनेमा लव्हस्टोरीवर आधारित आहे. परंतु 3 वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर दंगलीच्या धरतीवर आधारित आहे. देशभरात शुक्रवारी रिलीज झालेला या सिनेमाचा अभिनेता जिमी शेरगिलच्या विरोधात फतवासुध्दा काढला होता.
सिनेमा बॅन करण्याचे नाहीत आदेश...
- मेरठचे जिल्हाधिकारी पंकज यादव यांनी सांगितले, की अॅडमिनिस्ट्रेशनची या प्रकरणात कोणतीच भूमिका नाहीये. सरकारकडूनसुध्दा सिनेमा बॅन करण्याचे कोणतेच आदेश नाहीये. सिनेमा न चालवणे थिएटर मालकांचा निर्णय आहे.
सिनेमा स्क्रिनिंग करून रिस्क घ्यायची नाहीये...
- मुजफ्फरनगरच्या ब्रिज सिनेमाचे मॅनेजर राजीव कुमार यांनी सांगितले, 'काही वर्षांपूर्वी येथे खापच्या मुद्दयावर बनलेला एक सिनेमा लावण्यात आला होता. त्यानंतर आमच्या थिएटरची तोडफोड करण्यात आली होती. शोरगुलसुध्दा वादग्रस्त सिनेमा आहे. त्यामुळे कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये. आम्ही सिनेमाचे स्क्रिनिंग करणार नाहीये.'
जिल्हाधिकारी म्हणाले, 'गरज असेल तर आम्ही सुरक्षा देऊ'
- मुजफ्फरनगरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले, मुजफ्फरनगरमध्ये 'शोरगुल'वर बंदी आहे. जे थिएटर मालक सिनेमाचे स्क्रिनिंग करत नाहीये, तो स्वत:चा निर्णय आहे.
- ते पुढे म्हणाले, 'जर त्यांना सिनेमा थिएटरमध्ये चालवायचा असेल तर आम्ही सिक्युरिटी द्यायला तयार आहोत.'
- तसेच सिनेमाचे निर्माता व्यास वर्मा म्हणाले, की आम्ही यूपी डीजीपीसोबत या प्रकरणाविषयी बातचीत केली. थिएटर मालकांना या प्रकरणात मदत केली जाईल.
- इतकेच होऊनदेखील मेरठ आणि मुजफ्फरनगरचे थिएटर्स सिनेमाचे स्क्रिनिंग करत नाहीये.
बातम्या आणखी आहेत...