आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

32 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता 'HERO', जाणून घ्या आता कुठे आहे फिल्मची स्टारकास्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सलमान खान फिल्म्स प्रॉडक्शनचा 'हीरो' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित या सिनेमाद्वारे आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली आणि सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी यांनी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली आहे. 1983 मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई दिग्दर्शित 'हीरो' या सिनेमाचा हा ऑफिशिअल रिमेक आहे.
जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, अमरीश पुरी, मदन पुरी, बिंदू, संजीव कुमार, भारत भूषण, उर्मिला भट्ट आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या. या सिनेमाच्या रिलीजच्या 32 वर्षांचा काळ लोटला आहे. यामधील अनेक स्टार्सचा लूक वाढत्या वयामुळे बदलला आहे. तर काही स्टार्स आता या जगात नाहीत.
Divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, 1983 च्या 'हीरो'मधील स्टारकास्टविषयी...
खरे नावः मीनाक्षी शेषाद्री
पात्राचे नावः राधा माथूर

मीनाक्षी शेषाद्रीने आता वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे सिनेसृष्टीला रामराम ठोकून मीनाक्षी वैवाहिक आयुष्य जगत आहे. 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'घातक' या सिनेमात ती शेवटची झळकली होती. यामध्ये तिने गौरी हे पात्र साकारले होते. सध्या ती पती हरीश मैसोर आणि मुले केंद्रा आणि जोशसोबत प्लानो टेक्सासमध्ये वास्तव्याला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सिनेमातील इतर स्टारकास्टविषयी...