आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Pictures Of Salman’S EMOTIONAL GOODBYE To Friends Visiting Him Will Melt Your Heart!

गतकाळातील अभिनेत्री वहीदा यांनी घेतली सलमानची गळाभेट, या स्टार्सनीही केले सांत्वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 वर्षे जून्या हिट अँड रन या प्रकरणात सलमानला 6 मे रोजी सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालानंतर सलमान, त्याचे कुटुंबीय आणि बॉलिवू़करांना मात्र मोठा धक्का बसला. कोर्टाच्या या निकालानंतर त्वरीत सलमानच्या जामीनासाठी हायकोर्टाटा अर्ज करण्यात आला आणि त्याला दोन दिवसांसाठी अंतरित जामीन मिळाला. मात्र या जामीनावर आज (8 मे) हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सलमान तुरुंगात जाणार की त्याला जामीन मिळाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अशातच 6 मेच्या रात्रीपासून सलमानला भेटण्यासाठी बॉलिवू़डकरांनी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये गर्दी केली. राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, बिपाशा बसु, करण जोहर, शाहरुख खान, आमिर खान, प्रिती झिंटा, रमेश तौराणी, संगीता बिजलानी यांसारख्या सेलेब्सनी सलमानची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. मात्र 6 मे रोजीच नव्हे कालही त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्स स्पॉट झालेत.
गतकाळातील अभिनेत्री वहीदा यांनीदेखील सलमानचे सांत्वन केले. त्यांनी सलमानची गळाभेट घेऊन त्याच्या चेह-यावरून हात फिरवला. सोबतच नगमा, आदित्य रॉय कपूर, अश्मित पटेल, करीना कपूर, हृतिक रोशन, गोविंदासह अनेक स्टार्स काल सलमानच्या घरी दिसले.
सलमान अनेकांना गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर निरोप देताना आणि स्टार्सची गळाभेट घेताना दिसला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गुरुवारी सलमानची भेट घेण्यासाठी आलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...