आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Actress Will Play The Role Of Pratyusha Banerjee On Screen

\'आनंदी\'वर बनतोय सिनेमा, ही अभिनेत्री झळकणार प्रत्युषा बॅनर्जीच्या रुपात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी आणि तनिषा सिंह - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी आणि तनिषा सिंह
मुंबई: छोट्या पडद्यावरील आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यू दोन आठवडे उलटून गेले. तिच्या आयुष्यावर 'हर पल यहा है धोका' सिनेमा तयार होणार असल्याची बातमी समोर आली आहे. या सिनेमात अभिनेत्री तनिषा सिंह प्रत्युषाची भूमिका पडद्यावर साकारणार आहे. तनिषा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य सिनेमांशिवाय बॉलिवूडचा 'तेरी फितरत' सिनेमा पूर्ण केला आहे. तिचा हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.
शनिवारी मुंबईत झाला सिनेमाचा मुहूर्त...
ग्रीन लीव्स स्टार एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि सुधा फिल्म्सच्या बॅनरमध्ये तयार होणा-या 'हर पल है यहा धोका' सिनेमाचा मुहूर्त मुंबईच्या अंधेरी (वेस्ट) स्थित चार बंगलाच्या जीप ट्रॅक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये झाला. सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश नारायण अग्रवाल करत असून त्यांचे 'तेरी फितरत' आणि 'इश्क बरसा दे पिया' हे दोन सिनेमे रिलीजसाठी तयार आहेत.
पुढील महिन्यात सुरु होणार शूटिंग...
या सिनेमात राहुल राज सिंहची भूमिका श्रवण राघव करणार आहे. सिनेमाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. सध्या, मुंबईमध्ये याच्या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु आहे. तनिषा आणि श्रवणशिवाय आर्यन वैद आणि साहिल प्रभाकरसुध्दा सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तनिषा सिंहचे ग्लॅमरस फोटो...