आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा नाही ही आहे खरीखुरी मॉडेल, या कारणामुळे झाली अशी अवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुतळ्यासारखी दिसणाऱ्या या महिलेने मेकअप करून हे रूप मिळवलेले नाही. तर ती प्रत्यक्षात तशीच आहे. ती आहे अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल मेलनी गेडोस. 28 वर्षांची गेडोस हिची अॅक्टोडर्मल डिस्प्लेशिया नावाच्या एका दुर्मिळ जेनेटिक डिसऑर्डरमुळे अशी अवस्था झाली आहे. तिला केसही नाहीत आणि नखेही नाहीत. या डिसऑर्डरमुळे केस, दांत, नखे, हाडे, स्किन आणि ग्लँड्सच्या वाढीवर परिणाम होत असतो. 

ना केस, ना दात, ना नखे 
- मेलनी गेडोसचे ओठ आणि टाळू जन्मापासूनच फाटलेले होते. तिचे डोळे आणि कानातही वंध्यत्व होते. त्याच्या उपचारासाठी तिला लहानपणी 40 ऑपरेशन्स करावे लागले होते. 
- मेलनीला दातही नाहीत. दोन वर्षांपूर्वी तिने कृत्रिम दात बनवून घेतले होते. पण लवकरच तिने ते वापरणे बंद केले. विना दाताचेच ती जेवण करत असल्याचे मेलनीचे म्हणणे आहे. ती विगही वापरत नाही. 
- लक्षणांनुसार अॅक्टोडर्मल डिस्प्लेशिया 180 प्रकारचा असतो. त्याच्या दुष्परिणामांमध्ये घाम न येणे आणि शरिराचे तापमान नियंत्रित न राहणे याचाही समावेश असतो. 
- मेलनीला या समस्यांचाही सामना करावा लागतो. जास्तीत जास्त पाणी पिणे आणि सावली किंवा एसीमध्ये राहावे लागते. तसे केले नाही तर तिच्या समस्या अधिक वाढतात. 
-लूक आणि आरोग्याच्या एवढ्या समस्या असूनही मेलनी न्यूयॉर्कमध्ये एक प्रसिद्ध मॉडेल आहे. पण तिने कधी मॉडेलिंगचा विचार केला नव्हता. 
- न्यूयॉर्कच्या प्रॅट इन्स्टीट्यूटमध्ये आर्ट्सचे शिक्षण घेताना तिने एक प्रयोग म्हणून फोटो काढला होता. त्यानंतर तिने तो एका फोटोग्राफरला मेल केला. त्यानंतर तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली होती. 
- 6 वर्षांपासून मॉडेलिंग करणाऱ्या मेलनीकडे आता कामाची काही कमतरता नाही. काही दिवसांपूर्वी तिने आय-डी मॅग्झिनच्या समर इश्यूसाठी फोटोशूट केले होते. सध्या ती युरोपात एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मेलनी आता हाय-फॅशन मॉडेलिंगमध्ये संधी शोधत आहे. 
- मेलनी म्हणते मला माझ्या शरिराची काहीही अडचण नाही. ते दिसायला जसे आहे आणि ज्याप्रकारे काम करते तसाच स्वीकार मी केला आङे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुतळ्यासारख्या दिसणाऱ्या मेलनीचे आणखी काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...