आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांची असताना बनावे लागले वेश्‍या, आता बॉलिवूडची यशस्‍वी लेखिका म्‍हणून ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शगुफ्ता रफीक आणि महेश भट - Divya Marathi
शगुफ्ता रफीक आणि महेश भट
मुंबई- शगुफ्ता रफीक हे बॉलिवूडमधील अस नाव आहे जे फार कमी जणांना माहिती आहे. मात्र त्‍यांच्‍या आयुष्‍याचा संघर्षमय प्रवास थक्‍क करणारा आहे. शगुफ्ता रफीक यांना आज 'आशिकी 2' सिनेमाची लेखिका म्‍हणून ओळखले जाते. फार कमी जणांना माहिती आहे की, यशस्‍वी बॉलिवूड लेखिका म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या शगुफ्ता वयाच्‍या 17व्‍या वर्षीच वेश्या व्‍यवसायात ढकलल्‍या गेल्‍या होत्‍या.
 
हा खुलासा स्‍वत: शगुफ्ता यांनी एका मुलाखतीदरम्‍यान केला आहे. त्‍या म्‍हणाल्‍या,'वयाच्‍या साडे सतराव्‍या वर्षी एका अनोळखी व्‍यक्‍तीसोबत व्‍हर्जिनिटी गमावणे अत्‍यंत वेदनादायी अनुभव असतो. 27 वर्षांची होईपर्यंत मी एका व्‍यक्तिकडून दुसऱ्या व्‍यक्तिकडे जात होते. माझ्या आईलादेखील माहिती होते की, मी वेश्‍या व्‍यवसाय करते.' 
 
जन्‍मदात्‍या आईची माहिती नाही 
शगुफ्ता यांनी मुलाखतीमध्‍ये सांगितले की, तिच्‍या जन्‍मदात्‍या आईबद्दल तिला काहीही माहिती नाही. अनवरी बेगम यांनी शगुफ्तांना दत्‍तक घेतले होते. त्‍यांनाच त्‍या आई मानतात. शगुफ्ता म्‍हणतात, 'माझ्या जन्‍माबद्दल तीन कथा होत्‍या. पहिली कथा अशी की मी त्‍या काळातील प्रसिध्‍द अभिनेत्री आणि दिग्‍दर्शक बृज सदाना यांची पत्‍नी सईदा खान यांची मुलगी आहे. दुसरी कथा मला अशी सांगितली जात असे की, मी अशा आईची मुलगी आहे जिचे श्रीमंत पुरुषाबरोबर संबंध होते. आणि जन्‍म झाल्‍यानंतर तिने मला टाकून दिले. तिसरी अशी की माझे पालक अत्‍यंत गरीब होते आणि झोपडपट्टीत राहायचे. त्‍यामुळे त्‍यांनी मला सोडून दिले.
 
मी दोन वर्षांची असताना सईदा खान यांचा विवाह बृज साहेबांबरोबर झाला होता. मात्र जेव्‍हाही लोक मला अन्वरी बेगम यांच्‍यासोबत पाहत असे तेव्‍हा म्‍हणायचे की, 'ती बघा शगुफ्ता. आपल्‍या नानीसोबत जात आहे.' 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, शगुफ्ताच्‍या संघर्षाची कहाणी 
  
बातम्या आणखी आहेत...