आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

102 Not Out : अमिताभ म्हणाले हा आहे Real Look, पाहा ऑन लोकेशन फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन यांनी त्याच्या अपकमिंग '102 Not Out' चित्रपटाचा रियल लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, T 2429 - Since the media has put out a leaked picture of '102 not out' .. might as well give you the real one.. या चित्रपटात अमिताभ बच्चनसह ऋषि कपूरही झळकणार आहेत. अमिताभ यात 102 वर्षाच्या म्हाताऱ्याचा तर ऋषि कपूर त्यांच्या 75 वर्षीय मुलाच्या भूमिकेत आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनेही अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या या चित्रपटाचा एक फोटो शेअर करत फर्स्ट लूक दाखवला होता. विशेष म्हणजे तीन दशकांनंतर प्रथमचे हे दोन अॅक्टर एकत्र काम करताना दिसणार आहेत. 26 वर्षांपूर्वी बिग बी आणि ऋषी कपूर 1991 मध्ये आलेल्या 'अजूबा' मध्ये एकत्र झळकले होते. त्याशिवाय या दोघांनी एकत्रितपणे 'कभी-कभी', 'अमर अकबर अँथनी', 'नसीब' आणि 'कुली' अशा चित्रपटांतही एकत्र काम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर, बिग बी आणि ऋषी कपूर यांचे चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे काही PHOTOS..
 
 
बातम्या आणखी आहेत...