आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावतीच्या वादावर बोलला सलमान खान, \'फिल्म न पाहाताच त्यावर भाष्य करणे योग्य नाही\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान. - Divya Marathi
सलमान खान.

मुंबई - 'पद्मावती'वरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे काही राज्यांनी बंदी घातली आहे, तर काही नेते 'पद्मावती'च्या विरोधात आहेत. बॉलिवूड हळुहळु 'पद्मावती'च्या समर्थनार्थ समोर येत आहे. 1 डिसेंबर ही चित्रपट प्रदर्शनाची निर्धारित तारीख होती, मात्र देशात कुठेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आता सलमान खान 'पद्मावती'बद्दल बोलला आहे. 

 

- एका मुलाखतीत सलमान म्हणाला, 'चित्रपटांवरुन वाद घालणे कोणाच्याच फायद्याचे नाही. यामुळे झाले तर सर्वांचे नुकसानच होते. थिएटरच्या बाहेर प्रदर्शन झाले तर थिएटर मालक तोडफोडीच्या भितीने स्क्रिनिंग करत नाही.' 
- सलमान खान पुढे म्हणाला, 'चित्रपट न पाहाताच त्याबद्दल मत तयार करणे आणि कोणाच्या भावना दुखावणे हे योग्य नाही.' 
- नुकत्याच झालेल्या हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिटमध्ये 'पद्मावती'बद्दल सलमान म्हणाला, 'या केसमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे. काय खरे आणि काय खोटे हे आम्हाला माहित नाही. आता सुप्रीम कोर्ट आणि सेन्सॉर बोर्डाला निर्णय घ्यायचा आहे. सेन्सॉर बोर्डाचा निर्णयाचा आम्ही सन्मान करु, कारण ती शासकीय संस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...