आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदूस्तानसाठी पाकिस्तान सोडून आली होती ही मुस्लिम अॅक्ट्रेस, केले होते पहिले बोल्ड फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 15 ऑगस्ट आल्याबरोबर देशात स्वातंत्र्य आणि फाळणी अशा दोन्ही घटनांच्या आठवणी एकाचवेळी ताज्या होतात. 1947 मध्ये इंग्रज तर गेले मात्र देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग करुन गेले. बॉलिवूडचे अनेक स्टार्स एका झटक्यात विदेशी झाले अर्थात पाकिस्तानी झाले. त्यातीलच एक होत्या बेगम पारा. त्या पाकिस्तानात गेल्या, मात्र त्यांचे मन काही तिथे लागले नाही. मनाने त्या भारतातच होत्या. म्हणूनच त्या पाकिस्तानातून परत भारतात आल्या.

-ब्रिटीश कालिन पंजाबातील झेलम येथील एका मुस्लिम कुटुंबात 25 डिसेंबर 1926 रोजी जन्म झालेल्या बेगम पारा यांनी दिलीप कुमार यांचे लहान भाऊ नासिर खान यांच्यासोबत लग्न केले.
- फाळणीनंतर नासिर यांनी पाकिस्तानात राहाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना तीन मुले (अभिनेता अयूब आणि आणखी दोन) आहेत.
- 1974 मध्ये नासिर खान यांचे निधन झाले. त्यानंतर बेगम पारा मुलांना घेऊन भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 1975 मध्ये त्या भारतात आल्या, त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले.

50 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री
- 1956 मध्ये बॉलिवूड सोडून गेलेल्या बेगम पारा यांनी जवळपास 50 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री केली.
- संजय लिला भंसाळीच्या 'सांवरिया' मध्ये त्यांनी सोनम कपूरच्या आजीची भूमिका केली होती. त्यानंतर अवघ्या एका वर्षाने, 9 डिसेंबर 2008 मध्ये झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.

या चित्रपटात केले होते काम
- 1944 मधील चित्रपट 'चांद' मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर 'सुहागरात' (1948), 'नया दौर' (1953), 'लैला मजनू' (1953) आणि 'किस्मत का खेल' (1956) सारख्या चित्रपटांतून झळकल्या होत्या.

भारतातील पहिला बोल्ड फोटोशूट बेगम पारा यांचा
- भारतातील पहिल्या बोल्ड फोटोशूटसाठीही बेगम पारा यांना ओळखले जाते. 1951 मध्ये त्यांनी लाइफ मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले होते. यात त्यांनी व्हाइट साडीमध्ये सिगरेटचे कश घेताना पोज दिले होते.
- त्यानंतर त्या बॉलिवूडची फर्स्ट Bombshell आणि Pin Up Girl म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या.
- त्यांचे हे फोटोशूट तेव्हाचे प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बुर्के यांनी केले होते.

या फोटोशूटची खास झलक तुम्हीही पाहू शकता, पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...