आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या काळात मरणासन्न अवस्थेत आढळली होती ही अॅक्ट्रेस, जाणून घ्या कसा झाला होता एड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 1 डिसेंबर... हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.  मानवी समाजासमोर आव्हान निर्माण केलेल्या या आजाराबाबत जनजागृती करणे हा एकमेव उद्देश ठेऊन 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. 

 

एड्स या आजारामुळे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला होता. ती अभिनेत्री कोण होती, तिला एड्स हा आजार कसा जडला, जाणून घ्या... 

 

निशा नूर... हे नाव कदाचित तुम्ही कधी ऐकले नसावे. पण 80 च्या दशकातील हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव होते. निशाची लोकप्रियता एवढी होती, की रजनीकांत आणि कमल हसन हे बडे स्टार्स तिच्यासोबत काम करण्यास इच्छूक असायचे. मात्र एवढी लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाल्यानंतरसुद्धा निशाचा शेवटचा काळ अतिशय वेदनाजनक होता.

 

निर्मात्याने ढकलले वेश्या व्यवसायात...
असे म्हटले जाते, की निशाला एका निर्मात्याने तिची फसवणूक करुन तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते. याच काळात तिला एड्सची लागण झाली. त्यानंतर इंडस्ट्रीतील लोक तिच्यापासून दुरावले. इंडस्ट्रीने पाठ फिरवल्यानंतर निशाने ही इंडस्ट्री सोडून दिली. मात्र नंतर तिला अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीतून कुणी तिला बघायलादेखील आले नाही.

 

मृत्यूशी झुंज देताना आढळली होती रस्त्यावर....
हळूहळू निशाची आर्थिक परिस्थिती बेताची बनत गेली. शेवटच्या काळात तर तिची अवस्था इतकी बिकट बनली, की ती रस्त्यांवर भीक मागताना आढळली. याकाळात ती हळूहळू मृत्यूच्या दाढेत ओढली गेली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला एड्स असल्याचे समोर आले. 2007 साली निशाने मृत्यूला कवटाळले. एका प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा निशा नागोर दर्ग्याजवळ आढळली होती, तेव्हा तिच्या शरीराला किडे आणि मुंग्या लागल्या होत्या.

 

निशाचे गाजलेले सिनेमे...
कल्याण अगथिगल (1986), 'अय्यर द ग्रेट' (1990), टिक टिक टिक (1990), चुवाप्पू नाडा', 'मिमिक एक्शन 500' आणि 'इनिमई इधो' हे निशा नूरचे गाजलेले सिनेमे आहेत.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, निशा नूरचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...