आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Generations: Aishwarya And Her Mother With Aaradhya Is The Cutest Family Picture Ever!

Three Generations: आई आणि आजीसोबतचा आराध्याचा हा क्यूट फोटो वेधून घेतोय लक्ष!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने अलीकडेच रॉयल स्टाईलमध्ये तिची क्यूट परी आराध्याचा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीत संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांसोबत सहभागी झाले होते.
या पार्टीतील अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर आली. या सर्व छायाचित्रांमध्ये लक्ष वेधून घेणारे ठरले ते आराध्याचे तिच्या आई आणि आजीसोबत क्लिक झालेले छायाचित्र. आजी वृंदा राय (ऐश्वर्याची आई) आणि आई ऐश्वर्यासोबत आराध्या या छायाचित्रात पोज देताना दिसतेय. या छायाचित्रात तीन पिढ्या एकत्र आल्या आहेत.
बच्चन कुटुंबाच्या जुहूस्थित प्रतिक्षा बंगल्यात डिस्ने थीमवर आयोजित या पार्टीत सर्वांनीच भरपूर एन्जॉय केले. या खास दिवसाच्या निमित्ताने आराध्यासाठी खास लंडनहून ड्रेस मागवण्यात आला होता.