आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' : आमिर-फातिमाने शूट केला डान्स नंबर, अमिताभही जोरदार थिरकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' पुढील वर्षीच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. 'बिग बी' आणि 'मिस्टर परफेक्शनिस्ट' प्रथमच या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहेत. सोर्सेसच्या माहितीनुसार आमिर आणि फातिमा सना शेखने नुकताच एक डान्स नंबर शुट केला आहे. या डान्स नंबरला प्रभूदेवाने कोरिओग्राफ केले होते. अमिताभ बच्चनही या डान्समध्ये होते. फिल्मसिटीमध्ये शूट करण्यात आलेल्या या गाण्यात आदिवासींचे सेलिब्रेशन दाखवण्यात आले आहे. सेटवरील एका सुत्राच्या माहितीनुसार, डान्स दरम्यान अमिताभ यांनी ज्या स्टेप केल्या त्या पाहाण्यासारख्या होत्या. याही वयात त्यांचा असलेला उत्साह हा वाखणण्याजोगा होता. स्वतः प्रभुदेवालाही बिग बींचा उत्साह पाहून आश्यचर्य वाटले होते. काही दिवसांपूर्वीच या डान्सच्या अनुभवाबद्दल अमिताभ यांनी ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते, T 2695 - At 75 made to dance .. and accomplish that, which Prabhudeva, the genius directs ..😟 happy you are home instead of an asylum 🌹🌹
 
बातम्या आणखी आहेत...