आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बागी 2' चा फर्स्ट लूक, टायगरचा हा अंदाज पाहून चाहते पुन्हा एकदा पडतील त्याच्या प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टायगर श्रॉफ 2016 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या 'बागी' चित्रपटाचा सिक्वल 'बागी 2' द्वारे जोरदार पुनरागमन करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. टायगरने इन्स्टाग्रामवर पोस्टर पोस्ट केले असून त्याला, “Here we go…again #Baaghi2 #SajidNadiadwala #AhmedKhan @nadiadwalagrandson @foxstarhindi” असे कॅप्शनही दिले आहे. या पोस्टरमध्ये टायगरचे बॅक मसल्स दाखवण्यात आले असून, त्याच्या हातात गन दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून सिल्व्हेस्टर स्टॅलॉनच्या रॅम्बो सिरिजची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. बागी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 100 कोटी क्लब गाठण्यात या चित्रपटाला यश आले होते. 

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत टायगरने पोस्ट केलेले फोटो पाहता, या चित्रपटासाठी तो जोरदार तयारी करत असल्याचे लक्षात येते. या चित्रपटातील त्याचा लूक कसा असणार याचा काहीसा अंदाजही त्याच्या या फोटोंवरून लावता येऊ शकेल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, टायगर श्रॉफचे सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...